Dhule News : जलकुंभांची साफसफाई, जलवाहिन्यांची वॉश आउट अशी सर्व कामे होत आहेत, तरीही गढूळ पाणी का, पाण्याची स्थिती ‘जैसे थे’ कशी, असा सवाल खुद्द स्थायी समिती सभापतींनी सभेत अधिकाऱ्यांना केला.
दरम्यान, एका ठेकेदाराकडून कामे मिळत नसताना केवळ निविदा भरली जाते याचे गौडबंगाल काय, असा सवाल करत शहरात निकृष्ट कामे होत आहेत, रस्ते निकृष्ट होतात, असा आरोप सत्ताधारी नगरसेवकाने घरचा आहेर दिला. (Envy of ruling party in standing committee meeting to surround administration about contaminated water Dhule News)
महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत मनपा हद्दीतील बडगुजर जलकुंभावरील सम्पवेलमधील गाळ काढणे, नवीन व्हॉल्व्ह बसविणे, वरखेडी रोड जलकुंभातील गाळ काढणे, व्हॉल्व्ह बसविण्यासाठी आलेल्या तीन लाख ६५ हजार ८४५ रुपये खर्चाला कार्योत्तर मंजुरीचा विषय स्थायीपुढे होता.
या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सुनील बैसाणे यांनी गढूळ पाण्याच्या तक्रारी कायम असल्याचे सांगितले व सर्वच जलकुंभांचा गाळ काढा, जीर्ण जलकुंभांच्या जागेवर नवीन जलकुंभ बांधा, अशी मागणी केली.
जीर्ण झालेल्या अशोकनगर जलकुंभाची अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्नही केला. सहाय्यक अभियंता प्रदीप चव्हाण यांनी जलकुंभांच्या स्वच्छतेसह व्हॉल्व्ह बदलाबाबत माहिती दिली.
त्या वेळी सभापती किरण कुलेवार यांनी कामे होत असली तरी गढूळ पाणी का, असा प्रश्न केला. सदस्य नरेश चौधरी यांनी आपल्या प्रभागात आठ-दहा दिवसांआड पाणीपुरवठा होतो. कमी दाबामुळे काही ठिकाणी चार-पाच तास पाणीपुरवठा करावा लागतो.
दोन वर्षांपासून व्हॉल्व्ह बदलण्याची मागणी करत आहे, मात्र हे काम होत नाही, अशी तक्रार केली. सदस्य किरण अहिरराव यांनी गळत्या, व्हॉल्व्ह बदलणे ही कामे सुरूच राहणार आहेत.
नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, असा प्रयत्न आहे. अक्कलपाडा पाणीयोजनेतून दिवसाआड पाणी शक्य नाही पण किमान दोन दिवसांआड पाणी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ठरवून निकृष्ट कामे
सत्ताधारी भाजप सदस्य हर्षकुमार रेलन यांनी ए. के. सैफी या ठेकेदाराच्या अनुषंगाने प्रश्न केले. अनेक निविदांमध्ये सैफी भाग घेतात व नेहमीच वाढीव दराने निविदा असते. कामे मात्र यांना मिळत नाहीत.
एकदा पात्र ठरलेले असताना काही कारणांनी तेही काम मिळाले नाही. एलबीटीची निविदाही यांनी भरली होती. हा काय प्रकार आहे, काय गौडबंगाल आहे, असा त्यांनी प्रश्न केला. सपोर्टिंग टेंडर भरले जाते का? असे आणखी काही लोक आहेत, असे श्री. रेलन म्हणाले.
हाच संदर्भ घेत त्यांनी शहरात कामे निकृष्ट होत आहेत, रस्त्यांची कामे निकृष्ट होत आहेत कारण हे ठरवून होत असल्याचा आरोप श्री. रेलन यांनी केला.
यावर अभियंता कैलास शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराकडून यापूर्वी अनेक कामे केली आहेत, आजही सुरू आहेत, असे नमूद करत निविदा मॅनेज होत असल्याचा संशय असल्यास संबंधित ठेकेदाराला स्थायी समिती मनाई करू शकते, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.