Interior of complex damaged by birds. In the second photo, the damaged electrical fittings and other materials in the complex. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवनियुक्त पालकमंत्र्यांनी संकुलाचे ‘पुनर्वसन’ करावे; क्रीडाप्रेमींची अपेक्षा

सम्राट महाजन

Nandurbar News : येथील तालुका क्रीडासंकुल सात वर्षांपासून धूळखात पडले आहे आणि त्याला कारण ठरले आहे संकुल चालविण्याच्या अटी आणि निकष. किचकट अटी, निकष आणि त्यातून संकुल चालविणे फारच खर्चिक आहे.

त्यामुळे संकुल चालविण्यासाठी कोणत्याही संस्थेने अथवा क्रीडामंडळांनी पुढाकार घेतला नसल्याचे बोलले जाते. (Expectation of sports lover to redevelopment of complex nandurbar news )

संकुलाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी पुढाकार घ्यावा, तसेच मदत व पुनर्वसनमंत्री तथा नूतन पालकमंत्री अनिल पाटील यांनी ‘मदत’ करीत संकुलाचे ‘पुनर्वसन’ करावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

तळोदा तालुका क्रीडासंकुलाचे लोकार्पण झाल्यानंतर त्या वेळी स्थानिक खेळाडू, क्रीडाप्रेमींना खूप आनंद झाला होता. क्रीडासंकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काची जागा उपलब्ध झाली होती.

आता आपल्या उपजत क्रीडागुण, क्रीडाकौशल्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होत, आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभेल, अशी स्वप्ने त्या वेळी खेळाडूंनी बघितली होती. मात्र सात वर्षांनंतरदेखील त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरलीच नाहीत आणि याला सर्वांत मोठा अडसर ठरले आहेत क्रीडासंकुल चालविण्याचे निकष आणि त्यामुळे निर्माण होणारा आर्थिक मुद्दा.

किचकट निकष, आर्थिक मुद्दा

क्रीडासंकुल तयार झाल्यानंतर ते चालविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा एखाद्या क्रीडामंडळाने पुढे घेणे आवश्यक होते. मात्र संकुल चालविण्याच्या अटी, निकष किचकट असल्याने कोणीही पुढे आलेले नाही. संकुल चालविणे खर्चिक बाब असल्याचे बोलले जाते.

संकुल चालविण्यासाठी मार्गदर्शक, निगा राखण्यासाठी रखवालदार, संकुलाच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च कसा करावा, असा प्रश्न उभा राहिल्याने संकुल चालविण्यासाठी सात वर्षांत कोणीही पुढे आलेले नाही. दरम्यान, माजी आमदार उदेसिंग पाडवी, आमदार राजेश पाडवी यांनी क्रीडाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष यांची बैठक घेत याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र आजतागायत संकुलाच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. त्यामुळे आजही क्रीडासंकुल ठेकेदाराच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते.

आमदारांनी लक्ष घालावे

तळोदा आदिवासीबहुल तालुका आहे, त्यातच नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने शासन वेळोवेळी जिल्ह्यासाठी अनेक तरतुदी करीत असते. आमदार राजेश पाडवी मतदारसंघात अनेक विकासकामे करीत आहेत, त्यांनी संकुल चालविण्याबाबत निकषात काही सूट मिळू शकते का तसेच शासकीय क्रीडा योजनांच्या माध्यमातून संकुल चालविता येऊ शकते का, याबाबत शासनदरबारी प्रयत्न करावेत, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.

पालकमंत्र्यांनी ‘मदत’ करीत ‘पुनर्वसन’ करावे

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अमळनेरचे आमदार तथा मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यांची कार्यशैली धडाकेबाज असल्याने त्यांनी तरी तळोदा तालुका क्रीडासंकुलाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी ‘मदत’ करावी आणि संकुल खेळाडूंसाठी उघडे करून त्याचे ‘पुनर्वसन’ करावे, अशी अपेक्षा खेळाडू, क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT