Garbage burning along the Mumbai Agra highway  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महामार्गालगतची झाडे जळण्यामागेही अर्थकारण; जाणकारांचे मत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा एवढ्या जाणवत नसल्या, तरी उकाडा मात्र जाणवत आहे. उन्हाळ्यात महामार्गालगत दुतर्फा असलेले जिर्ण महाकाय वृक्ष बऱ्याच ठिकाणी जळताना दिसत आहेत. (Experts say that there is an economic reason behind burning of trees dhule news)

वृक्ष तोडता येत नाहीत. चोरी तर अजिबात करता येत नाही. अशा स्थितीत जीर्ण झाडांना पेटवून त्यांचा कोळसा विकण्यात काही मंडळी सराईत झाली आहे. या झाडांच्या जळण्यामागेही ‘अर्थकारण’ दडलेले आहे, असे जाणकार सांगतात.

उन्हाळा सुरु होवून दोन महिने उलटले आहेत. एप्रिल सुरु झाला आहे. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे अद्याप पाहिजे तशी उन्हाळ्याची झळ जाणवलेली नाही. दर पंधरा दिवसांनी वातावरणात बदल होत आहे. ढगाळ वातावरण आणि सोसाट्याने वाहणारे वारे यामुळे तापमानाने चाळीशी ओलांडलेली नाही.

सध्या मुंबई-आग्रा महामार्ग, नागपूर सुरत महामार्गालगत काही ठिकाणी जीर्ण झालेली झाडे जळताना दिसत आहेत. ही झाडे जाळण्यामागे अर्थकारणच असल्याचे सांगितले जाते. ही झाडे काही सराईत मंडळी जाळतात आणि त्याचा कोळसा राजरोसपणे बाजारात विकत असतात. यातून चांगल्यापैकी फायदा करून घेत असतात.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, जीर्ण झालेले झाड जाळण्यामुळे काही छोटी झाडे आणि मोठ्या झाडांनाही आग लागते. त्यांचेही नुकसान होत असते. याकडे वन विभागाने आणि महामार्ग प्राधिकरणाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

धुम्रपानाचेही कारण

महामार्गालगत बऱ्याच ठिकाणी कोरडा कचरा जळताना दिसतो. वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरते. लहानांसह मोठ्या झाडांचेही नुकसान होत असते. काही धुम्रपान करणाऱ्यांकडूनही या आगींचा उद्‌भव होत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT