Kailas Patil, a farmer in Shivara, his children giving water by hand to save the cotton crop due to the heat.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Rain Crisis : पिके वाचविण्यासाठी हाताने पाणी देण्याची वेळ; शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Rain Crisis : जिल्ह्यात आजअखेरही समाधानकारक अथवा मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे मुसळधारेची प्रतीक्षा कायम आहे. अशातच जेमतेम पावसावर पेरणी केलेल्या पिकांना आता पाण्याची गरज असतानाच पावसाने दीर्घ दडी मारली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच पिके वाचविण्याची चिंता वाढली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची पिके उन्हाच्या तीव्रतेने करपू लागली आहेत, तर ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते हाताने पाणी देऊन पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.

जिल्ह्यात मागील वर्षी बेमोसमी पावसाने हैदोस माजविला होता. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. (farmer giving water by hand to crops to save from heat nandurbar news)

बिगरमोसमी पाऊस भरपूर झाला होता. तरीही यंदाच्या उन्हाळ्यात मात्र अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागले होते. नंदुरबार शहरातील काही वसाहतींनासुद्धा विकत टॅंकर घेऊन नागरिकांनी पाण्याची तहान भागविली होती.

अशा परिस्थितीत यंदा पाऊस जोरदार होईल, अशी अपेक्षा होती. हवामान खात्यानेही १६ जूननंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र तो फोल ठरल्याचे चित्र आहे. पाऊस झाला, मात्र तो समाधानकारक किंवा मुसळधार नव्हे तर अंगण शिंपडण्यासारखा होता. त्यात एक पाऊस काही तालुक्यांमध्ये जोरदार झाला. मात्र नंदुरबार तालुक्यात तरी अद्याप जोरदार पाऊस नाही.

तशाच स्थितीत आज ना उद्या जोरदार पाऊस होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेऊन पेरणी केली. रिमझिम पावसामुळे पेरलेले बियाणेही उगवले. पिके गुडघ्यापर्यंत आली. ती हवेत डोलू लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पिके तग धरत होती. आतापर्यंत निभावले. मात्र श्रावणमास सुरू असतानाही पावसाचा थेंब नाही. एकीकडे श्रावणमासात पावसाची झडी लागते. मात्र परिस्थिती त्याच्य उलट आहे. पावसाऐवजी आता तीव्र उन्हाचा अनुभव सारेच घेत आहेत.

या उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. करावे तरी काय, हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, कूपनलिका आहेत ते विहिरीतून पाणी उपसणार मात्र ते पुरेसे नाही. त्यामुळे ते शेतकरी पाण्याची नांदडे भरून शेतात पिकाच्या प्रत्येक झाडाला विशेषतः कपाशी, पपईसारख्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.

मात्र ज्यांचे कोरडवाहू क्षेत्र आहे त्यांनी पावसावर अवलंबून कापूस लागवड केली आहे. त्यांच्यापुढे तर काहीही पर्याय नाही. त्यामुळे ते डोक्याला हात लावूनच बसले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नंदुरबार तालुक्यात पाऊस अत्यल्प झाला आहे.

त्यामुळे या तालुक्यातील जनतेला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पिकांचे तर नुकसान अटळ आहे.

मात्र पाऊस न झाल्यास आगामी उन्हाळ्यापूर्वीच येथील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती अटळ आहे.

सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट

जिल्ह्यात पाच मध्यम व १२ लघुसिंचन प्रकल्प आहेत. त्यात पावसाअभावी अत्यल्प साठा आहे. काही प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये आजअखेर शिवण (वीरचक) प्रकल्पात केवळ ३९ टक्के साठा आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. नवापूर तालुक्यातील भरडू प्रकल्पात ६६ टक्के, पळशी २६ टक्के, तर अक्कलकुवा कालुक्यातील देहली प्रकल्पात शंभर टक्के साठा आहे.

लघु प्रकल्पांमध्ये मेंदीपाडा ३५, वागदी २४, नटावद १६, खैरवे १२, चिरडा ६०, तर धनपूर व भुरीवेल या दोन्ही प्रकल्पांमध्ये शंभर टक्के साठा आहे. मात्र नंदुरबार तालुक्यातील बलदाणे, चौपाळे, घोटाणे, नवलपूर (ता. शहादा) या प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे.

"जेमतेम पावसावर कापूस वाढविला. आता पाण्याची गरज आहे. मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे कापूस करपू लागला आहे. तो वाचविण्यासाठी विहिरीतून पाणी काढून प्रत्येक झाडाला २०० ते २५० मिलिलिटर पाणी हाताने टाकून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती नकोशी वाटू लागली आहे." -कैलास पाटील, शेतकरी, भालेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT