Nandurbar Chilli Rate Hike : मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकरी मिरचीला पुन्हा एकदा पसंती देऊ लागला आहे. तालुक्यात सुमारे ३०० हेक्टरवर मिरचीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
ठिबक, मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मिरची उत्पादक शेतकरी मिरचीचे चांगले उत्पन्न घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या मिरचीला किलोमागे १२० ते १५० रुपये भाव मिळत असून, मिरची कधी परिपक्व होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Farmers planted chilli on about 300 hectares in taluka nandurbar news)
तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड करण्यात आली असून, ठिबक, मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत संबंधित शेतकऱ्यांनी मिरची पिकाचे चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून मिरचीची लागवड करताना शेतीची मशागत करून ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे बेड तयार करण्यात येऊन ठिबक टाकून त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन करण्यात आले आहे. दोन बेडमध्ये चार ते पाच फुटांचे अंतर ठेवण्यात येत असून, दोन रोपांमध्ये सव्वा ते दीड फुटांचे अंतर ठेवून रोपांची लागवड करण्यात आली आहे.
दरम्यान, तळोदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने मिरचीचे पीक आता चांगलेच वाढले असून, ते फुलोऱ्यात आले आहे. काही ठिकाणी कोवळी मिरची लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पन्नाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान, तालुक्यात पावसासोबतच वारेदेखील वाहत असून, पावसाची रिपरिपदेखील सुरू आहे. त्यामुळे मिरची पिकाला आपल्या फांद्यांचा भार सोसणे कठीण जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून काळजी घेण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांच्याकडून शेवटच्या बांधाच्या एका टोकापासून ते बांधाच्या दुसऱ्या टोकापर्यंत मिरची पिकाचा चांगला पक्का दोरा समांतर रेषेत बांधण्यात येत आहे, जेणेकरून मिरची पिकाच्या फांद्यांचा भार त्या दोऱ्यावरच पडण्यास मदत होईल.
मिरची पीक परिपक्व होत असताना फांद्या वाकू नयेत, मोडू नयेत याबद्दल शेतकऱ्यांकडून खबरदारी घेण्यात येत असून, आपल्या मिरची पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांकडून पिकाची खरबदारी
सध्या मिरचीला १२० ते १५० रुपये भाव किलोमागे असून, मिरची कधी परिपक्व होते याकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मिरची उत्पादक शेतकरी रोज शेतांमध्ये फेरफटका मारत असून, कुठे काही शेताचे नुकसान तर नाही ना किंवा पिकांच्या फांद्या तर मोडल्या गेल्या नाही ना याबाबत खबरदारी घेत आहेत.
"शेतात दर वर्षी मिरची पिकाची लागवड करण्यात येते. या वर्षीही अडीच एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली असून, मिरचीच्या फांदीवर भार येऊ नये यासाठी एका सरीच्या टोकापासून ते शेवटपर्यंत दोरा बांधला आहे. येत्या काही दिवसांत मिरची परिपक्व होणार असून, चांगला भाव मिळाल्यास मागील तूट भरून निघण्यास मदत होणार आहे." -मुरलीधर कापसे मिरची उत्पादक शेतकरी रांझणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.