Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असून त्यात हद्दवाढीतील गावांना मूलभूत सेवासुविधा पुरविणे अशक्यप्राय झाल्याची कबुली प्रशासनाने नुकतेच दौऱ्यावर येऊन गेलेले जिल्हा पालक सचिव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासमोर दिली.

त्यामुळे हद्दवाढीतील गावांच्या विकासाचे भवितव्य शिंदे- फडणवीस सरकारच्या हाती असून त्यासाठी महापालिकेने सादर केलेला १२६ कोटी २५ लाखांच्या निधीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (Financial condition of municipal corporation dhule deteriorated dhule news)

येथील महापालिका ‘ड’ वर्गात आहे. पुढील वर्षी दिवाळीनंतर महापालिकेची निवडणूक असल्याने भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी विकास निधी उपलब्धतेसाठी कंबर कसली आहे. २००३ ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पाच जानेवारी २०१८ ला हद्दवाढ झाली.

त्यात अंशतः नगावसह ११ गावांचे एकूण ५४.६२ चौकिमी क्षेत्र महापालिकेत समाविष्ट झाले. त्यामुळे शहराचे पूर्वीचे ४६.४६ चौकिमी क्षेत्र आणि त्यात हद्दवाढीतील क्षेत्र मिळून शहराचा एकूण परीघ १०१.०८ चौकिमी झाला आहे. आधीच चौफेर विस्तारणाऱ्या धुळे शहरात असंख्य कॉलन्या वर्षानुवर्षे मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. त्यात हद्दवाढ क्षेत्राचा विकास साधताना महापालिकेची दमछाक होत आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

आर्थिक स्थिती बिकट

महापालिकेची आधीच आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्यात हद्दवाढ झाल्याने या क्षेत्रात नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे अशक्यप्राय झाले आहे. शहराची तापी पाणीपुरवठा योजना ही गुरूत्ववाहिनीची नसून पंपिंगद्वारे कार्यान्वित असते. ती जीर्ण झाल्याने योजनेचा देखभाल दुरुस्ती व वीजेचा खर्च मोठा आहे.

तसेच, शहरात सद्यःस्थितीत अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजना, अक्कलपाडा वाढीव पाणीपुरवठा योजना, राज्यस्तरीय नगरोत्थान (रस्ते) योजना, जिल्हास्तरीय नगरोत्थान योजना आदींमधील कामे सुरू आहेत. या योजनेसाठीचा महापालिकेचा हिस्सा महापालिकेलाच भरावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती फारच अडचणीची झाली आहे, अशी मांडणी प्रशासनाने पालक सचिवांसमोर केली.

१२६ कोटींचा प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर हद्दवाढ क्षेत्रात विकासासाठी १२६ कोटी २५ लाखांच्या निधी मागणीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. तो निधी मिळाल्यास हद्दवाढीतील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविता येतील, असा युक्तिवाद करत प्रशासनाने या निधी उपलब्धतेसाठी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेत्यांच्या मदतीने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

हद्दवाढ क्षेत्रासाठी निधीची अशी मागणी

गावाचे नाव..........अपेक्षित असलेली रक्कम

वलवाडी.............२५ कोटी ७४ लाख ९१ हजार

भोकर................०६ कोटी २५ लाख ६१ हजार

महिंदळे...............१२ कोटी ५९ लाख ३७ हजार

चितोड................२६ कोटी ७४ लाख ८१ हजार

अवधान...............१२ कोटी ०५ लाख ९३ हजार

वरखेडी................०२ कोटी ८८ लाख ७८ हजार

मोराणे..................१३ कोटी ७० लाख ५७ हजार

नकाणे..................०७ कोटी १३ लाख ०९ हजार

बाळापूर................०६ कोटी ०४ लाख ८१ हजार

पिंप्री....................०१ कोटी ५८ लाख ०१ हजार

पथदीप.................११ कोटी ५० लाख ०१ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT