नाशिक : मालेगाव शहरातील अय्युबनगर भागात आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी घडली दुर्घटना घडली असून या अग्नितांडवात तब्बल सहा घरांना आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की यात अस्सान मोबीन अहमद या चार महिन्याचा बालकाचा गंभीररित्या भाजल्याने मृत्यू झाला आहे. तसेच या बालकाची आई यास्मीन अहमद जखमी झाली आहे. लागलेल्या आगीत दोन घरे जळून संपूर्णत: खाक झाली आहेत. तसेच घरे, संसारोपयोगी साहित्य जळाल्याने नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच कसरत
आग लागल्याचे कळताच मनपा अग्निशमन दलाच्या सात बंबांनी विझविली. सहा मिटर अरूंद गल्लीतील आग विझवितांना अग्निशामक दलाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. अग्निशमन दलाचे अधिक्षक संजय पवार व जवानांच्या तत्परतेमुळे २०१८ मध्ये झालेल्या नागछाप झोपडपट्टी आगीची पुनर्रावुत्ती टळली. आगेचे नेमके कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा > PHOTO : दुभाजक ओलांडून एसटी घुसली थेट पंक्चर दुकानात..अन्...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.