Dr. while guiding the review meeting of Bambulagwad campaign organized under MNREGA in Collectorate office. Vijayakumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Vijaykumar Gavit : जिल्ह्यात पहिले मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल : डॉ. विजयकुमार गावित

सकाळ वृत्तसेवा

Vijaykumar Gavit : नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतींना मिळालेल्या सामूहिक वनहक्कांच्या जमिनींवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जगातील सर्वप्रथम व सर्वांत मोठे दहा हेक्टरवरील मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल नर्मदा खोऱ्यातील परिसरात करणार असून, सर्व संबंधित यंत्रणांनी या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजवणी करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. (first man made bamboo forest in district nandurbar news)

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २६) मनरेगांतर्गत आयोजित बांबूलागवड मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्य कृषिमूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, भारत सरकार (नवी दिल्ली)चे फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार, मंत्रालयातील मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, नागपूरच्या बांबू बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव, मनरेगाचे राज्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी राजेंद्र शहाडे, कृषी विभागाचे सहाय्यक आयुक्त के. एस. श्रीकांत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की व विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.या वेळी झालेल्या चर्चेत भारत सरकार (नवी दिल्ली)चे फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार, मंत्रालयातील मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, नागपूरच्या बांबू बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव यांनीही मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात बांबूलागवडीस वाव ः पाशा पटेल

महाराष्ट्रात प्रथमच मुख्यमंत्री कार्यालयात एक स्वतंत्र बांबू मिशन सेल व त्यासाठी दोन स्वतंत्र विशेष कार्य अधिकारी नेमण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात बांबूलागवडीसाठी पूर्ण वाव असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे.

ही मोहीम सफल करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. कितीही बांबूलागवड केली तरी ते पूर्ण खरेदी करण्यासाठी एक कंपनी असून, ही कंपनी पूर्ण बांबू खरेदी करते. बांबूलागवड कामात सर्व अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करावे, अशी अपेक्षा राज्य कृषिमूल्य समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केली.

बांबूलागवड सर्वांची जबाबदारी ः डॉ. हीना गावित

जिल्ह्यातील स्थलांतरित लोकांच्या जमिनी कसण्यायोग्य नसल्याने ते मजुरीसाठी दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात. त्या जमिनीवर लोकांना तेथेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, सामूहिक वनहक्कांच्या जमिनीवर बांबूलागवड करण्याचे नियोजन करावे. नंदुरबार या आदिवासीबहुल

जिल्ह्यात बांबूलागवडीचे काम चांगले होईल, जगाला वाचविण्यासाठी आदिवासी बांधव सर्वांत जास्त बांबूलागवडीचे काम करतील. बांबूलागवड हे शासकीय काम न समजता आपल्या सर्वांची जबाबदारी म्हणून करावे लागणार आहे. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार असून, ऑक्सिजनसाठी हे काम प्राधान्याने करावे, असे खासदार डॉ. हीना गावित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT