Eknath Shinde esakal
उत्तर महाराष्ट्र

Shasan Aplya Dari : जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना; अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शासनाची महत्वाकांक्षी मोहीम ‘शासन आपल्या दारी’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील या मोहिमेचे दैनंदिन संनियंत्रण व मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे. (For effective implementation of shasan tumchya dari Public Welfare Cells were established at district level nandurbar news)

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ दिले जाणार आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा जनकल्याण कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे.

त्यासाठी जिल्हा विशेष कार्यकारी अधिकारी कैलास देवरे यांची नंदुरबार जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून शासनातर्फे सदर योजनेसाठी नियुक्ती झाली आहे. जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांचा कक्ष गठित करण्यात आला असून या कक्षाचे सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

हे असतील सदस्य

कक्षात अपर पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि. प., जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) जि. प. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तहसीलदार (महसूल) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, गटविकास अधिकारी,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पंचायत समिती, नंदुरबार, सहाय्यक आयुक्त, नगर परिषद प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, महा- आयटी, जिल्हा समन्वयक, महा-आयटी,जिल्हा व्यवस्थापक, सी. एस. सी. एस. पी. व्ही. यांचा या कक्षात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

जनकल्याण कक्षाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

- जिल्ह्यातील सर्व विभाग व महामंडळे यांच्याशी संपर्क करणे,

- मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्याशी समन्वय ठेवणे.

- योजनांची यादी तयार करणे.

- विविध विभागांना येणाऱ्या अडचणींची नोंद ठेवणे.

-जिल्ह्यातील विभागांकडून दैनंदिन आढावा घेणे.

-दैनंदिन आढाव्याची दररोज नोंद घेणे, त्यात सुधारणेसाठी प्रमुखांशी संपर्क साधणे.

-जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT