Alupane, Rankeli, Sonru, Terabhaji, Chitrak esakal
उत्तर महाराष्ट्र

Forest Vegetable Competition 2023: स्पर्धेसह वनभाज्यांची कीर्ती सातासमुद्रापार! कॅनडाच्या संशोधकाची संकल्पना

भिलाजी जिरे

Forest Vegetable Competition 2023 : कॅनडास्थित मोनोटोवा विद्यापीठातील प्रा. डॉ. शैलेश शुक्ल पीएच.डी.च्या संशोधन प्रबंधासाठी बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे वास्तव्यास होते.

त्यांच्या संकल्पनेतून २००४ पासून बारीपाड्यात वनौषधी व वनभाजी पाककला स्पर्धा सुरू झाली. (Forest Vegetable Competition 2023 Canadian researchers concept dhule News)

त्यामुळे या स्पर्धेची कीर्ती देशविदेशात पसरली. मुळात अबोल, लाजऱ्या आदिवासी सुगरणींना बोलते करून पाककलेचे पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे हा स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे आदर्श बारीपाड्याचे शिल्पकार चैत्राम पवार सांगतात.

राज्य शासनाचे पर्यटन संचालनालय आणि बारीपाडा जैव विविधता संरक्षण समितीतर्फे बारीपाडा येथे २७ ऑगस्टला वनभाजी स्पर्धा-२०२३ होणार आहे. स्पर्धेचे यंदा १९ वे वर्षे असून, शनिवारी (ता. १९) सायंकाळी पाचपर्यंत १६५ महिलांनी नोंदणी केली आहे.

परिसरातील मोहगाव, मोगरपाडा, शेंदवड, चावडीपाडा, मांजरी, मापलगाव आदी गावांतील आदिवासी सुगरणी स्पर्धेत सहभागी होतात. यंदा वनभाजी स्पर्धेच्या पाहणीसह अभ्यासासाठी मध्य प्रदेशातील झांबोआ जिल्ह्यातील ३५ आणि ठाणे जिल्ह्यातील १० अभ्यासकांची नोंदणी झाली आहे.

वनौषधी भाज्यांचे वैशिष्ट्य

बारीपाड्यासह परिसरातील पंधरा ते वीस गावांनी वन विभागाच्या सहकार्याने जंगलाचे संरक्षण व संवर्धन केले आहे. त्यात पिंपळपाडा, मोहगाव, चावडीपाडा, शेंदवड, मांजरी, वर्दडी, विजयपूर, धामणदर, मंडाणे, मापलगाव, कालदरचा समावेश आहे.

बारीपाड्याच्या दक्षिणेस घनदाट जंगल असून, ते घोड्याच्या नालीच्या आकारात आहे. यात दुर्मिळ वनसंपदा आहे.

शंभरावर वनौषधी, वनभाज्या आहेत. त्यांचा वापर परिसरात नागरिक आयुर्वेदिक वनौषधी भाजी म्हणून करतात. वनभाज्या अनेक आजारांवर फायदेशीर ठरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रदर्शनातून मिळते माहिती

स्पर्धेवेळी परीक्षक आदिवासी सुगरणींकडून वनभाज्यांचे महत्त्व जाणून घेतात. अनेकांसाठी वनभाजी पाककला स्पर्धा पारंपरिक ज्ञानाची पर्वणीच ठरते. जैवविविधता तसेच आरोग्यहितासाठी स्पर्धेला महत्त्व आहे.

काही भाज्या वाफेवर, तेलाच्या वापरातून, तर काही भाज्या विनातेल शिजवून, काही फोडणी देऊन, तर काही कंदमुळे वाफेवर तयार केले जातात. स्वादिष्ट, खमंग वनभाज्या प्रदर्शनात मांडल्या जातात.

निसर्गप्रेमींसाठी अनुभूती

स्पर्धेतील महिला जंगलातून वनभाज्या आणतात. वनौषधी व विविध भाज्यांमध्ये आळिंब, ओवा, बाफळी, बांबू कोम्ब, कडव्या, हलुंदा, केळभाजी, कोहळा, चंदका, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगलीचूच, मेका, मोखा, नागूळद, रजगिरा, रानतुळस, सोनारू, सोलव्या निंबू, शिरीषफूल, तुराठा, उळशी, वनदोडका, काही उपयुक्त वनस्पतीच्या मुळ्या, पाने, फुले, खोड, फळ, साल, बी, कंद आदी स्पर्धेत पाककलेतून मांडले जाते. निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी ही अनोखी अनुभूती ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT