esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News | लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हक्कांची जबाबदारी स्वीकारावी : चंद्रकांत रघुवंशी

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ३६ पात्र लाभार्थ्यांना एक कोटी ८० लाख रुपयांच्या सिंचन विहीर मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.

पंचायत समितीचे सर्व सदस्य एकदिलाने काम करीत असून, लोकप्रतिनिधींनी जनतेत फक्त मते मागण्यासाठी न जाता त्यांच्या हक्कांची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. (Former MLA Chandrakant Raghuvanshi statement about people representatives nandurbar news)

नंदुरबार पंचायत समितीच्या (स्व.) हेमलताताई वळवी सभागृहात माजी आमदार रघुवंशी यांच्या हस्ते सिंचन विहिरींच्या पात्र लाभार्थ्यांना आदेश वितरित करण्यात आले. शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी सभापती माया माळसे, उपसभापती प्रतिनिधी धर्मेंद्र परदेसी, गटविकास अधिकारी उगले, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सयाजीराव मोरे, मुन्ना पाटील, माजी बांधकाम सभापती विक्रमसिंह वळवी, सदस्य कमलेश महाले, तेजस पवार, प्रल्हाद राठोड, जितेंद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, सरपंच अविनाश पाडवी, राजापूरचे सरपंच तेजमल राठोड, खामगावचे सरपंच राजेश वसावे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

या वेळी माजी आमदार रघुवंशी म्हणाले, की शासनाच्या अनेक योजना असतात; परंतु त्याची माहिती जनतेला माहिती नसते. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांनी आपल्या गावागावांतील पात्र लाभार्थ्यांना योजनांची प्रस्ताव सादर केली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी फक्त जनतेत मत मागण्यासाठी जाऊ नये. जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

या गावातील लाभार्थ्यांच्या समावेश

पंचायत समितीच्या माध्यमातून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, तिलाली, निंभेल, रजाळे, गुजरजांभोली, दहिंदुले बुद्रुक, ढेकवद, करजकुपे, कोठली खुर्द, शिंदगव्हाण, जूनमोहिदे, दहिंदुले खुर्द, तलवाडे खुर्द, चौपाळे गावातील ३६ लाभार्थ्यांना एक कोटी ८० लाखांच्या सिंचन विहिरी मंजुरी आदेशाचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT