Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : माजी सरपंचावर चाकूहल्ला; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बाह्मणे (ता. शिंदखेडा) येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील (वय ४७) यांच्यावर गावातील तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करीत चाकूने हल्ला केला. त्यात ज्ञानेश्वर पाटील यांच्या गालावर गंभीर दुखापत झाल्याने दहा संशयितांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (former sarpanch was beaten and attacked with knife by youth of village dhule crime news)

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून व्यसनाधीनतेकडे जाऊ नका, कोणाला त्रास देऊ नका, असे नेहमी टोकत असल्याच्या कारणाने मनात राग धरून १ मेस सायंकाळी आठच्या सुमारास गावातच दहा जणांच्या टोळक्यातील संशयितांनी लाठ्याकाठ्या घेऊन शिवीगाळ केली व त्यातील एकाने ‘आज तुझा मुडदा पाडतो,’ असे म्हणत खिशातून चाकू काढत वार केला.

त्यात श्री. पाटील यांनी वार चुकवला. परंतु डाव्या गालावर चाकूचा घाव लागल्याने अति रक्तस्राव झाल्याने तत्काळ ग्रामस्थांनी दोंडाईचा येथे खास दवाखान्यात उपचारासाठी आणले. प्राथमिक उपचारानंतर धुळे येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मंगळवारी (ता. २) धुळे येथेच दुखापत झालेले ज्ञानेश्वर पाटील यांचे समक्ष जबाब दोंडाईचा पोलिसांनी नोंदविल्यानुसार दहा संशयित आरोपींविरोधात सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT