Disabled Person News esakal
उत्तर महाराष्ट्र

E Motorcycle : शिरपूरला 11 दिव्यांगांना ई- मोटरसायकल; पटेल चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ११ दिव्यांगांना मोफत ई- मोटरसायकल भेट देण्यात आली. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. (free E motorcycles gift for 11 disabled people in Shirpur dhule news gbp00)

मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आर. सी. पटेलमधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात शिरपूर शहर व तालुक्यातील ११ दिव्यांगांना ई- मोटरसायकलची भेट देण्यात आली. तसेच द्वेता पटेल यांच्या वजनाइतके लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.

द्वेता भूपेशभाई पटेल यांच्यासह आमदार काशीराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उदयपूर येथील डॉ. बन्सीलाल शिंदे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, सुभाष कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, पौर्णिमा पाठक आदी प्रमुख पाहुणे होते.

माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, आदिवासी भागात द्वेता पटेल यांनी भरपूर काम केले असून तिचा अभिमान आहे. द्वेता पटेल व कृतिबेन पटेल यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू, गरीबांसह महिला व युवतींसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेक महिला व तरुणींना पायावर उभे करण्यासाठी बहुमोल सहकार्य करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. जिल्हा महिला व बाल विकास योजना परीविक्षा अधिकारी डी. एस. लांडगे यांनी शासकीय शुभ मंगल सामुदायिक विवाह सोहळा, माझी कन्या भाग्यश्री व बाल संगोपन योजनेची माहिती दिली व योजनांचा शुभारंभ केला.

ज्येष्ठ सुभाष कुलकर्णी म्हणाले, द्वेता पटेल यांनी आतापर्यंत तालुक्यात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले. कमी वयात त्यांची समाजाप्रती जाण, संवेदनशीलता प्रेरणादायी आहे. पटेल परिवाराचा सुसंस्कृत वारसा द्वेता पटेल पुढे नेत असल्याने ते शिरपूर तालुक्यासाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे.

पौर्णिमा पाठक यांनी आभार मानले. लाभार्थ्यांनी ट्रस्टसह द्वेता पटेल यांचे आभार मानले. ट्रस्टच्या सौ. पाठक, डॉ. सुप्रिया पंतवैद्य, डॉ. श्वेता बेलगमवार, डॉ. गजानन पाटील, संजय चौधरी, भालेराव माळी, धीरज माळी, स्वीय सहाय्यक सुनील जैन, स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी, भैरव राजपूत आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT