Superintendent of Police Sanjay Barkund, Police Inspector Dattatray Shinde of LCB and the team along with the accused and seized items in the robbery incident. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : लूटमारीच्या घटनेत मित्रच निघाला मास्टरमाइंड; पाठलाग करत टोळीला पकडले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील हॉटेल नालंदाजवळील सर्व्हिस रोडवर लूटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करत २४ तासांच्या आत गजाआड केले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, तीन मोबाईल असा दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

टोळीतील तिघांनी सर्व्हिस रोडवरील लुटीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, या लुटीत फिर्यादीसोबत असलेला मित्रच मास्टरमाइंड निघाला.(friend turned out to be mastermind in robbery incident dhule crime news)

शहरातील चित्तोड रोडवरील खंडेराव मंदिराजवळील रहिवासी विलास बबनराव खताळ (वय ४२) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास त्याचा मित्र मोईन हुसनोद्दीन शेख याच्यासह दुचाकी (एमएच १८, बीडब्ल्यू ३६९५)ने नालंदा हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवरून जात होते.

त्यादरम्यान ते लघुशंकेसाठी अंधारात थांबले असताना अज्ञातांनी त्यांच्याशी झटापट करत त्यांचा मोबाईल व दुचाकी हिसकावून नेली. याबाबत चाळीसगाव रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना या गुन्ह्यामध्ये फिर्यादीचा मित्र मोईन शेख सहभागी असल्याचा संशय एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना आला.

त्यांनी तत्काळ पथकाला मोईन शेख यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथाकने मोईन हुसनोद्दीन शेख (रा. मोहमदिया मशीद, देवपूर, धुळे) या एकवीरादेवी मंदिर, अमरधामजवळून ताब्यात घेतले. हा गुन्हा त्याचे मित्र सय्यद उमेर व फैसल शेख यांच्यासह कट रचून केल्याचीही त्याने कबुली दिली. सय्यद उमेर व फैसल शेख वडजाई रोडने शंभर फुटी रोडकडे येत असल्याचे दिसल्याने पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र ते दुचाकी सोडून शंभर फुटी रोडवरील मारिया लॉन्समध्ये लपून बसले. पथकाने पाठलाग करून त्यांना मारिया लॉन्स येथून ताब्यात घेतले. दोघांनी त्यांची नावे फैसल शेख जाफर (२३) व सय्यद उमेर सय्यद जाफर (२३, दोन्ही रा. काझी प्लॉट, वडजाई रोड, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्यांनी मित्र मोईन शेख याच्यासह कट रचून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात हिसकावलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी काढून दिली.

फैसल शेख जाफर याने गुन्ह्यातील फिर्यादीचा मोबाईल आपल्या जवळ असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ८० हजारांची दुचाकी (एमएच १८, एक्स ३९८३) व १५ हजारांचे तीन मोबाईल असा एकूण एक लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT