crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : फरारी 16 गुन्ह्यांतील आंतरराज्यीय गुन्हेगाराला अटक; 6 घरफोड्यांचे गुन्हे उघड

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : गुप्त माहितीनुसार तळोदा, शहादा, म्हसावद व सारंगखेडा परिसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणाऱ्या टोळीतील एकजण नवलसिंग ऊर्फ ठाकूर मध्य प्रदेशमध्ये इंदूरमधील चौत्राम मंडीच्या मागे मुलाच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबीचे पोलिस निरीक्षक खेडकर यांनी पथक तयार करून तेथे रवाना करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. (Fugitive inter state criminal arrested in 16 cases 6 Burglary crimes revealed Nandurbar Crime News)

पथकाने इंदूरमध्ये नवलसिंग ऊर्फ ठाकूरचा शोध सुरू केला. तो गुरुद्वारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने गुरुद्वाराबाहेर सापळा लावला. गुरुद्वारामध्ये जाताना त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने नवलसिंग ऊर्फ ठाकूर जुवानसिंग ऊर्फ जवानसिंग भुरिया (वय ४०, रा. नाहवेल, पोलिस ठाणे बाग, ता. कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) असे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पद्धत यांची इत्थंभूत माहिती घेऊन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यातील कारागृहातून सुटून आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते.

त्याने मागील एक ते दीड वर्षात साथीदारांच्या मदतीने तळोदा शहरात रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर व घरांचे कुलूप तोडून घरफोडी केल्याचे सांगितले. त्यास तळोदा येथे नेऊन खात्री केली केली. स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, म्हसावद, सारंगखेडा, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीतील सराफ व्यावसायीयिक, किराणा दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी पकडून १६ गुन्हे उघड केले होते, त्या गुन्ह्यांमध्येदेखील नवलसिंग ऊर्फ ठाकूर जुवानसिंग फरारी होता.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, शहादा, तळोदा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून गुन्हेगारांवर कारवाईचे निर्देश सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल गोसावी, हवालदार मुकेश तावडे, पोलिस नाईक सुनील पाडवी, बापू बागूल, मोहन ढमढेरे, पोलिस अंमलदार रामदास माळी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT