'Ganpati' Immersion procession of 'Yakohama' Mandal in Yokohama city. Haresh Sonar, Priyanka Sonar performing the Mahaarti of Ganaraya esakal
उत्तर महाराष्ट्र

Ganeshotsav 2023: 'जपान’ मध्ये गणरायाचा मराठी माणसाकडून 'डंका'! विसर्जनाला वाजत गाजत मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : मराठी माणूस कितीही लांब असला सण,उत्सव,परंपरा विसरत नाही. जपान येथील याकोहामा शहरात ' योकोहामा ' मंडळ गेल्या आठ वर्षापासून आपली गणेशोत्सवाची परंपरा चालवत आहे.

योकोहामा मंडळाचा गणेशोत्सव सोहळा जणू येथील सर्व भारतीयांचे चैतन्याचे केंद्र बनले आहे. यंदा देखील मंडळाने दोन दिवसाचा गणेशोत्सव साजरा करत आपली वेगळी छाप ठेवली. मूळचे म्हसदी येथील रहिवासी हरेश अण्णासाहेब सोनार (चित्तम) यांच्या नेतृत्वात गणेशोत्सव साजरा झाला. (Ganeshotsav 2023 celebration of Ganesha in Japan by Marathi man Procession immersion dhule)

मंडळाने स्वतः जपानी सुतारकाम करून बनवलेल्या पालखीतून गजाननाची ढोल, ताशा लेझीमच्या गजरात मिरवणूक काढली.

उंच भगवे झेंडे, हाती टाळ घेतलेले बाल वारकरी, लेझिम पथक व नऊवारी साड्या परिधान केलेल्या महिलांचा घोळका, मर्दानी फेटे व नागपूर येथील मेजर टेक्स्टटाइल्स यांचे डिझायनर कुर्ते घालून मंडळाच्या पुरुष भक्तांची रीघ पाहून जपानी नागरिक देखील सहभागी झाले.

जपानमधील सर्व प्रकारच्या परवानगी काढून अतिशय शिस्तबद्धतेने कोणालाही त्रास ना होता हा उत्सव पार पाडला.

योकोहामा मंडळाची खास बाब म्हणजे मंडळ दरवर्षी एखादी अनोखी संकल्पना घेऊन नवीन पिढीला अध्यात्मिक, वैज्ञानिक विषयांची एकत्र सांगड कशी घालता येईल ही शिकवण देते.

नवीन पिढीला आधुनिक शिक्षणाबरोबर नैतिकतेचा धडा मिळावा याचा प्रयत्न मंडळ उत्सवाद्वारे करते. यावर्षीही योकोहामा मंडळाने अक्षय्य ऊर्जा ही संकल्पना मांडली.

सौर ऊर्जा, पवन उर्जा, जलविद्युत ऊर्जा याचबरोबर वीजप्रवाह कसा होतो हे सर्व देखावे मांडण्यात आले. अक्षय्य ऊर्जा हीच संकल्पना मनात ठेवून बाल भक्तांसाठी विविध कार्यक्रम राबवण्यात आले.

अक्षय्य ऊर्जावर सादरीकरण (प्रेझेंटेशन), चित्रकला, हस्तकला, स्वसंकल्पना आधारित प्रतिभा दर्शनाचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला. गणरायाची अतिशय सुंदर प्रतिमा ही थेट घाटकोपर येथील विलास आर्टस् कडून मागवण्यात आली.

बाप्पांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना, दररोज व शेवटी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अथर्वशीर्ष, पुराणातील कथा, भजने सादर झाली. विशेष म्हणजे भारतीय परंपरेत महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आला.

आपली परंपरा सातासमुद्रापार दिसावी म्हणून भक्तांच्या पंगती बसवण्यात आल्या. सांयकाळी आरती करून बाप्पांना निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक निघाली. अवघ्या दोन दिवसाच्या सोहळ्यात वर्षभराचा आनंद मनात साठवून भक्तांनी विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिला.

मायदेशी संस्कृतीची आठवण.....!

योकोहामा मंडळ जपानमध्ये सर्वात मोठा,आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करते. गणेशोत्सवाचा सोहळा मर्यादित कालावधीसाठी असला भारतीयांनी मायदेशी संस्कृती यानिमित्ताने जपली.

मंडळ वर्षभर सांस्कृतिक, सामाजिक कार्याचा ठसा उमटवित असते. परदेशात मायदेशी असल्याची भावना सर्व जपान निवासी भारतीयांना देणे हेच या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. वर्षभर समाजप्रबोधन व्हावे म्हणून मंडळ दसरा, नवरात्री, नवीन वर्षारंभ, मकरसंक्रांतीचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, मंगळागौर असे अनेक उत्सवी उपक्रम राबवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT