Nandurbar Ganeshotsav 2023 : नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील गणेशोत्सव काळात गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीवेळी मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत गणेशमंडळांना जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीतील प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.
या वर्षीपासून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय, तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे ज्यामध्ये प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह यांचा समावेश असेल. जिल्ह्यातील पोलिस ठाणेस्तरावर गणेशमंडळांना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
याबाबत प्रत्येक पोलिस ठाणेस्तरावर वकील, प्राध्यापक, डॉक्टर यांची समिती नेमण्यात आली आहे. बक्षिसासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील प्रथम, द्वितीय व तृतीय, तसेच दोन उत्तेजनार्थ गणेशमंडळांची निवड करण्यात येईल.
गणेशोत्सव काळात गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत तसेच मोठ्या मंडळांच्या ठिकाणी स्थापनाकाळात भक्तांच्या दर्शनासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी व पोलिस मोबाईल व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीवेळी मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांनी जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवावा.
पारंपरिक वाद्यांचा वापर करून, ध्वनिप्रदूषण न करता गणेशोत्सव शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरा करून जिल्ह्यातील गणेशमंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्तांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलास सहकार्य करावे, तसेच मोठ्या किंवा गर्दी होणाऱ्या मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
स्पर्धेसाठीचे निकष
-गणेशर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत फक्त पारंपरिक वाद्यांचा वापर.-गणेशमूर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर.
-गणेशस्थापना काळात उत्कृष्ट देखावा सादरीकरण.
-वेळेपूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे.
-श्रीगणेशाचे जागेवर विसर्जन करणे.
-गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे.
-गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्रीगणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविणे.
-पोलिस बंदोबस्ताशिवाय गणेशोत्सव साजरा करणे.-स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेशमंडळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.