Dhule Crime News : सरवड (ता. धुळे) फाटा ते गाव दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक चोऱ्या व दरोड्यात या टोळीचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बळसाणे येथील जैन मंदिर व चिमठाणे येथील मोबाईल दुकानातील चोरीतही या टोळीचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.
रविवारी (ता.२०) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. (gang in preparation for robbery was caught by police dhule crime news)
येथील पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीपथकाला सरवड फाटा ते सरवड गावादरम्यान लामकानी रस्त्यावर तीन दुचाकी व नऊ लोक संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले. पोलिस वाहन पाहताच ते तिघी दुचाकीवर भरधाव निघाले. पोलिसांनी पाठलाग करून एका दुचाकीस थांबविले. दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेण्यात आले मात्र एक पळून गेला.
उर्वरित दुचाकींसह इतर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी सरवड, नंदाणे, सायने, देवभाने, कापडणे परीसर पिंजून काढला. मात्र संशयित सापडले नाही. पकडलेल्यांपैकी एकाचे नाव श्रावण बापू मोरे (२२, रा. आनंदखेडा ता. धुळे) असून दुसरा विधीसंघर्षग्रस्त बालक आहे.
त्यांच्याकडे एक लोखंडी कटर, धारदार चाकू, लाल मिरचीची पूड, ५० हजाराची दुचाकी (एमएच १८, बीडब्ल्यू ४१४८), दोर असे साहित्य मिळून आले. ते लामकानी येथे मोबाईल दुकानात दरोडा टाकण्यासाठी जात होते असे चौकशीत उघड झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
फरार संशयित प्रेम मालचे (रा. इंदिरानगर, वाडीभोकर), ऋषीकेश दगडू सोनवणे, ईश्वर विजय वडार, सागर सुनील भिल, सचिन मणिलाल भिल, सागर सुरेश मोरे (सर्व कापडणे. ता. धुळे) यांची नावे उघडकीस आली.
त्यापैकी प्रेम मालचे व विक्की (कापडणे) हे फरार असून उर्वरितांना अटक करण्यात आली. पकडलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने संशयित प्रेम मालचे, काळू भटू भिल, योगेश शायसिंग मोरे, भुरा रामा वळवी (सर्व रा.बळसाणे ता. साक्री) आदींसह बळसाणे येथील जैन मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. संशयित काळू भिल, योगेश मोरे यांना ताब्यात घेत चोरीच्या रकमेपैकी ३० हजार रुपये हस्तगत केले.
चिमठाणे येथील मोबाईल दुकानात चोरी केली असेही समजले. पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सहाय्यक निरीक्षक गणेश फड, पोलिस विजय चौरे, नरेंद्र गिरासे, अमरिश सानप, राहुल सानप, सूरज सावळे, उन्मेश आळंदे, विजय पाटील यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.