Police squad with motorcycles seized by Shahada Police. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीला बेड्या; 10 गुन्ह्यांची उकल

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : शहादा पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांचा टोळीचा मागावर नजर ठेवून अखेर टोळीस बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सहा लाख ९० हजारांच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत.

त्यातून दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.(gang of motorcycle thieves arrest nandurbar news)

गेल्या १९ ऑक्टोबरला जिल्ह पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सातपिंप्री गावातील दशरथ खर्डे व त्याच्या साथीदारांनी नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच मोटारसायकलींची चोरी केली असून, खर्डे व त्याचा साथीदार चोरीची युनिकॉर्न मोटारसायकलीने प्रकाशामार्गे सातपिंप्री येथे त्याच्या घरी जात आहेत. ही माहिती त्यांनी शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिली. श्री. बुधवंत यांनी पथक कारवाईसाठी रवाना केले.

पथकाने प्रकाशा-शहादा रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्या वेळी दोन दुचाकीस्वार भरधाव येताना दिसले. पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळाले. पथकाला संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून त्यांना थांबविले. एक संशयित पळून गेला. एकास ताब्यात घेतले. त्याने नाव दशरथ खर्डे (वय २१) असे सांगितले.

त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकलीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. विश्वासात घेतल्याने त्याने चोरीची कबुली दिली. त्याने त्याचा साथीदार मुरा हिरला रावत (रा. अंजनबार, ता. सोंडवा, जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश) याच्या मदतीने शहादा, नंदुरबार, नवापूर, धुळे जिल्ह्यातील साक्री, मध्य

प्रदेशातील इंदूर व गुजरात येथील छोटा उदयपूर येते चोरी केल्याचे सांगितले. पथकाने मध्य प्रदेशातून मुरा हिरला रावत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा लाख ९० हजारांच्या चार पल्सर, तीन युनिकॉर्न, अशा १५ दुचाकी जप्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रकाश आंबेडकरांची राज्यात एखादी तरी जागा निवडून आली असती, तर आम्ही त्याची दखल घेतली असती' - शरद पवार

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Latest Marathi News Live Updates : राहुल गांधी कोल्हापूरमध्ये दाखल

Morning Routine: दिवसभर स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर करा 'या' गोष्टी, दिवसभर राहाल उत्साही

Bigg Boss 18 House: मातीच्या वस्तू अन् दगडाच्या खुर्च्या; कसं आहे सलमानच्या बिग बॉस १८ चं घर? पाहा inside video

SCROLL FOR NEXT