Minister Girish Mahajan speaking at Chetak Festival  
उत्तर महाराष्ट्र

Chetak Festival: सांरगखेड्याचा अश्व महोत्सव देशात आगळावेगळा : गिरीश महाजन

सारंगखेड्याच्या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा लाभला असून केवळ अश्व महोत्सवच नाही तर या यात्रेच्या निमित्ताने होणारा पशुंचा बाजार आणि सुक्या मेव्याचा बाजारही वैशिष्ट्यपूर्ण असतो.

सकाळ वृत्तसेवा

Chetak Festival : हजारो यात्रा आणि त्यानिमित्ताने होणारे महोत्सव देशभर होत असतात, परंतु सारंगखेड्याची यात्रा अन् चेतक महोत्सव हा देशातला आगळावेगळा स्वरूपाचा आनंद सोहळा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

सारंगखेडा येथे सुरु असलेल्या चेतक फेस्टिव्हलला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Girish Mahajan statement Horse festival of Sarangkheda is unique in country nandurbar news )

यावेळी आमदार जयकुमार रावल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिव्हलचे मुख्य प्रवर्तक जयपाल रावल, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, दोंडाईचा शहर माजी नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उगले शहाद्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, देवा रावल, कामराज निकम, महावीरसिंह रावल, देविदास बोरसे, धनंजय मंगळे, प्रभाकर पाटील, महेंद्र गिरासे, निखिल राजपूत आदी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, की यात्रेला ४०० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या यात्रेच्यानिमित्ताने देश-विदेशातील पर्यटक सारंगखेड्यात येतात. अश्व पाहण्याबरोबरच त्यांची खरेदीही करतात. लाखो-करोडो रूपयांची येथे उलाढाल होत असते.

या यात्रेचा संपर्क खानदेशवास यांना अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले, अलीकडे अश्व पाळणे आणि बाळगणे हा उंची छंद झाला असून पूर्वी युद्धात घोड्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत होता. अलीकडे अश्व हे संरक्षण दलात व पोलिस दलात परेडसाठी वापरले जातात.

महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी प्रयत्नशील : रावल

सारंगखेड्याच्या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा लाभला असून केवळ अश्व महोत्सवच नाही तर या यात्रेच्या निमित्ताने होणारा पशुंचा बाजार आणि सुक्या मेव्याचा बाजारही वैशिष्ट्यपूर्ण असतो. जुन्या काळात अफगाणिस्तान मधून येथे अश्व, सुका मेवा विक्री आणि प्रदर्शनासाठी येत असे.

चेतक फेस्टिव्हललाच्या रूपाने तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला ग्लोबल करण्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. ही यात्रा येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार रावल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT