शिंदखेडा (जि. धुळे) : आठ ते दहा वर्षांची तीन मुले भरउन्हात आणि सिमेंटच्या रस्त्यावरून घरी जात होती. त्यांच्या पायात चप्पल नसल्याने पाय चांगलेच भाजत होते. याच रस्त्यावरून शिंदखेडा शहराचे तलाठी तुषार पवार जात होते.
त्या मुलांचे हाल पाहून ते गहिवरले आणि चक्क त्यांना घेऊन चपलांचे दुकान गाठले. तिघांना आपल्या स्वखर्चाने त्यांनी त्यांच्या आवडीच्या चपला घेऊन दिल्या. त्यांच्या या माणुसकी धर्माचे सर्वत्र कौतुक होत आहे. (giving shoes to children walking around barefoot talathi tushar pawar preserved religion of humanity Dhule News)
तुषार पवार शहराचे तलाठी म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील तीन मुले आपले काम संपवून घराच्या दिशेने स्टेट बँकेसमोरून जात होती. एप्रिलचे भरदुपारचे कडक ऊन असल्याने सिमेंटचा असलेला रोडही तितकाच तापलेला होता.
अशा स्थितीत पाय अर्धवट जमिनीला टेकवत ही मुले चटके सहन करीत लंघडत लंघडत जात होती. हेच चित्र बँकेकडे जाणाऱ्या तलाठी पवार यांनी पाहिले. श्री. पवार यांचाही मुलगा त्याच मुलांच्या वयाचा आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
मुलांच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून त्यांना गहिवरून आले. मुलांची चौकशी करून त्यांना चप्पल विक्रेत्याच्या दुकानात घेऊन गेले आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या चपला घेऊन दिल्या. शिवाय त्यांना आइस्क्रीम ही खाऊ घातले. मुलेही या घटनेने खूश झाली.
ही मुले माझ्या मुलाच्या वयाची आहेत. त्यांच्यात माझा मुलगा दिसला आणि मला ते सहन झालेच नाही. मी काहीही विचार न करता त्यांना त्यांच्या आवडीच्या चपला घेऊन दिल्या, असे तुषार पवार यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.