Suspects in the case of merchant robbery at Taluka Police Station, officers and teams present during the inspection of the goods in question. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गावठी कट्ट्यासह पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराजवळ कांदा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता. १) शिताफीने गजाआड केले. त्यांच्याकडून पाच लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांना जिल्हा न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.(goods worth 600,000 rupees were seized along with Gavathi Kattya dhule crime news)

आर्वी (ता. धुळे) येथील कांदा व्यापारी हितेश शंकर पाटील हे मित्र रोहित घोरपडे यांच्यासह २७ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने धुळ्याकडून आर्वीकडे जात होते. यादरम्यान लळिंग घाट संपल्यावर रोकडोबा हनुमान मंदिराच्या उतारावर दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दोघांना अडवून हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यांच्याकडील सात लाखांची रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी व्यापारी हितेश पाटील यांच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.

गतीने तपासचक्रे

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी स्वत:कडे तपास घेतला. पथकातील नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, राजू पावरा, कुणाल शिंगाणे, राहुल देवरे यांच्यासह घटनास्थळी तक्रारदाराकडून माहिती घेतली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतीने फिरवून तांत्रिक पद्धतीचा वापर केला. सुरवातीला दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या साथीदारांची माहिती दिली.

४८ तासांत छडा

पोलिस पथकाने अवघ्या ४८ तासांत घटनेचा छडा लावत उज्जैन फकिरा गायकवाड (रा. जुन्नेर, ता. धुळे), दादू विठ्ठल सोनवणे (रा. मोरशेवडी, ता. धुळे), राहुल रमेश सूर्यवंशी (रा. चितोड, ता. धुळे), गोकुळ श्रावण आहिरे (रा. चितोड), बादल राजू मोरे (रा. बल्हाणे, ता. धुळे), अनिल हिरामण सोनवणे व प्रकाश खंडू सोनवणे (दोघे रा. दिवाणमळा, ता. धुळे) यांना अटक केली. संशयितांची शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने सात डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

असा मुद्देमाल जप्त

तालुका पोलिस पथकाने संशयितांकडून दोन लाख ६१ हजार १०० रुपयांची रोकड, २५ हजारांचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे, तक्रारदाराचा मोबाईल, तीन दुचाकी तसेच मोबाईल, असा पाच लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तथापि, गुन्ह्यात आठ संशयित निष्पन्न झाल्याने वाढीव कलम लावण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT