Governor Ramesh Bais while guiding at the inauguration of State Level Tribal Pride Day and Tribal Cultural Festival on Wednesday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल : राज्यपाल रमेश बैस

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोलीभाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोलीभाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट होईल.

म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोलीभाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (ता. १५) येथे केले.(Governor Ramesh Bais appeal to tribal culture is to be preserved nandurbar news)

नंदुरबार येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन बुधवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, राज्यपाल यांच्या सचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, विविध यंत्रणांचे अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस ‘आदिवासी जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा दिवस देशभरात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आदिवासी विकास विभागाने १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत हा गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.

आज या सर्व योजना आणि आदिवासी संस्कृतीचा जागर करण्यासाठी मी आदिवासी विकास विभागाचे अभिनंदन करतो. तसेच, मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, की भारत सरकार आणि राज्य शासन दोन्ही आमच्या आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी एकत्र काम करीत आहेत, करीत राहतील.

महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग एक हजारहून अधिक शाळा चालवत आहे. राज्यात ४९९ सरकारी आश्रमशाळा आणि ५३८ सरकारी अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच, ७३ ‘नमो शाळा’ आहेत, ज्या विज्ञान केंद्रे म्हणून आज कार्यरत आहेत. सुपर-५० प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘एनईईटी’ परीक्षांसाठी तयार केले जाते.

परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. ‘मेस्को’सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्रे चालवत आहे, जिथे त्यांना पोलिस दल आणि सशस्त्र दलात भरतीसाठी तयार केले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आदिवासी युवकांसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच, यात मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना आर्थिक मदतही दिली जाते. आज आदिवासी कला, चित्रकला, शिल्पकला, लोकगीते, लोकनृत्य यांची मागणी वाढत आहे.

आदिवासी बांधवांनी आपली भाषा, कला, नृत्य आणि संस्कृती जपण्याचे काम केले तर त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्यासही मदत होईल. अनेक आदिवासी बांधवांना शेती, रेशीम, मधनिर्मिती आदींचे पारंपरिक ज्ञान आहे. आदिवासी उत्पादने आणि कलांचे ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ आपल्या आदिवासी बांधवांना समृद्ध करेल.

सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करताना राज्यपाल बैस म्हणाले, की व्यसनाधीनता केवळ आपले जीवनच खराब करीत नाही, तर तुमचे कुटुंब आणि समाजही बिघडविते. मला विश्वास आहे, की केंद्र व राज्य सरकारच्या सामूहिक प्रयत्नांनी आणि तुमच्या पूर्ण सहभागाने आदिवासी बंधू-भगिनी इतिहासाची दिशा बदलतील व त्यांच्या कामगिरीने देशाला अभिमान वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT