Girish Mahajan attending the flag salutation at the Republic Day police drill ground esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्यात शेतकऱ्यांना 122 कोटींचा निधीवाटप : पालकमंत्री महाजन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण १२२ कोटींचा निधीवाटप केल्याची माहिती ग्रामविकास, पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ५४ हजार ३३५ शेतकऱ्यांना ४९ कोटी ४५ लाख ४१ हजार, तर प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख ४६ हजार ८४७ शेतकऱ्यांना दुष्काळसदृश स्थितीमुळे २५ टक्के अग्रिमप्रमाणे ७२ कोटी नऊ लाख रुपयांचा निधी वाटप केला आहे.

तसेच रब्बी हंगामात ७४ हजार ७७८ शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण १२२ कोटींचा निधीवाटप केल्याची माहिती ग्रामविकास, पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. (Guardian Minister Mahajan statement Fund allocation of 122 crore to farmers in district dhule news)

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी (ता. २६) मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा सोहळा झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी अभिनव गोयल.

जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीन सिंग, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील.

माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते. शहरासह जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांसह ठिकठिकाणी ध्वजवंदन सोहळा दिमाखात झाला.

जिल्ह्यासाठी विविध निर्णय

पालकमंत्री महाजन म्हणाले, की विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि योगदान आवश्यक आहे. राज्याच्या प्रगतीसाठी राज्य सरकारही कटिबद्ध आहे.

जिल्ह्यास २०२३-२०२४ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा २६५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. कमी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर आहे. धुळे, साक्री व शिरपूर तालुक्यातील २८ महसूल मंडळांमध्ये दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत.

संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ३०२ गावे व ३९ वाड्यांसाठी नऊ कोटी ७६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी विविध उपाययोजना होत आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

१०७ कोटींचा लाभ

जलयुक्त शिवार अभियानातील ४५ कामांसाठी साडेसहा कोटींच्या निधीतून कामे मंजूर आहेत. पशुधन निदान व उपचारासाठी दोन कोटींच्या निधीतून अत्याधुनिक सोनोग्राफी मशिन, डिजिटल एक्स-रे मशिन व सीआर सिस्टिम तसेच रक्त तपासणीसाठी ब्लड अनालायझरसारखे उपकरण घेण्यात आले आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २५० अनुसूचित जमातीच्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत १२० अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना बारमाही सिंचन, पशूंना निवारा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर, जनावरांच्या गोठ्यासाठी दोन हजार ६७८ शेतकऱ्यांना १०७ कोटी १२ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

आनंदाचा शिधा देणार

गरिबांसाठी शिवभोजन थाळी, श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन लाख ९२ हजार शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत मानवी हस्तक्षेपाशिवाय चलन, नकाशे व माहिती उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा ५५८ ग्रामपंचायतींपर्यंत पोचली आहे. यात ६० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी, दोन लाख आयुष्यमान भारत कार्डचे वाटप झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५८ हजार २०१ घरकुलांचे, शबरी आवास योजनेंतर्गत आठ हजार ३८, तर रमाई आवास ग्रामीण योजनेंतर्गत सहा हजार ६९२ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी दहा हजार ९३ बचतगटांना २३२ कोटी ३६ लाखांचे कर्ज दिले आहे. जिल्ह्यातील एक हजार १०५ जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक दर्जावाढीसाठी १७ कलमी व भविष्यवेधी शिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे.

५९७ शाळांना अभिसरणातून संरक्षण भिंतीची कामे करण्यात येणार आहेत, असे श्री. महाजन यांनी सांगितले. पोलिस पथकाने पथसंचलन केले. विविध विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. निवेदिका पूनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT