Dhule News : विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी नियोजनासाठी अमळनेरसह खानदेशातील विद्रोही साहित्यिक, समविचारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते योगदान देत आहेत.
त्याचाच भाग म्हणून आणि सर्वसामान्यांचाही हातभार लागावा यासाठी प्रातिनिधिक योगदानाप्रति एक मूठ धान्य दान आणि एक रुपया देणगी मोहीम धुळे शहरातील आग्रा रोडवर बुधवारी (ता. २४) दुपारी चारला राबविली जाईल. (Handful of Grain Donation campaign in Dhule news)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामार्गे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ही मोहीम राबविली जाईल. आयोजकांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लोकसहभागातून अमळनेर (जि. जळगाव) येथील आर.के.नगरसमोरील प्रांगणात ३ व ४ फेब्रुवारीला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे संमेलनाचे अध्यक्ष असतील.
अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर धमाणे, विद्रोही मराठी साहित्य संमलेनाचे प्रवर्तक ए. आर. पाटील, खानदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदाशिव सूर्यवंशी, अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील व व्रिदोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणी सहसमन्वयक एल. जे. गावित यांनी दिली.
श्री. ढमाले म्हणाले, की शासनाचे कोणतेही अनुदान वा देणग्या न घेता जनतेने उभारलेल्या निधीतून विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. हिंदी व्यंगकवी संपत सरल यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
ऊर्दू साहित्यिक रहमान अब्बास प्रमुख पाहुणे असतील. संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, गटचर्चा, कथाकथन, युवा मंच, गझल संमेलन, नाटक, एकपात्री, बालमंच, विचारयात्रांची रेलचेल असेल.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज, शायर निदा फाजली, डॉ. उमा चक्रवती, सुशीला टाकभौवरे, जयंत परमार, गोहार रझा, रसिका आगाशे आदींचा विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात सहभाग राहिला आहे.
आजवरच्या संमेलनाचे अध्यक्ष
मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे येथे व्रिदोही साहित्य संमेलन झाले आहे. बाबूराव बागूल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाप, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब.
जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंखे, ऊर्मिला पवार, प्रा. डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे या साहित्यिक, नाटककार, कवी-समीक्षकांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.