Harshvardhan Dahite panel won 9 seats in Farmers Cooperative Union elections dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Farmer Union Election : शेतकी संघावर ‘बळीराजा’चे वर्चस्व; हर्षवर्धन दहिते यांच्या पॅनलने 9 जागा जिंकल्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule Farmer Union Election : येथील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत सोमवारी (ता. ७) झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत १४ पैकी नऊ जागा जिंकत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनलने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले, तर प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.

येथील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत तब्बल २० वर्षांहून अधिक काळानंतर रविवारी (ता. ६) मतदान झाले होते. यात सोमवारी सकाळी आठपासून राजे लॉन्स मंगल कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. (Harshvardhan Dahite panel won 9 seats in Farmers Cooperative Union elections dhule news)

यात सर्वप्रथम सेवा सहकारी संस्था गटांची मतमोजणी झाली, यात तिन्ही जागांवर बळीराजा विकास पॅनलने विजय मिळविला होता. यानंतर झालेल्या सर्वसाधारण गटात सहापैकी तीन जागांवर बळीराजा, तर तीन जागांवर शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला.

इतर मागासवर्गीय व भटके विमुक्त गटात शेतकरी विकास पॅनलने, तर महिला राखीव व अनुसूचित जाती/जमाती गटात बळीराजा विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. या वेळी विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.

बळीराजा पॅनलच्या सर्व उमेदवार, प्रमुख नेते व समर्थकांनी मतमोजणी केंद्रापासून शेतकी संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत विलासराव बिरारीस यांच्या घरापर्यंत पायी रॅली काढत त्यांना अभिवादन केले.

निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्यासह विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तर बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

दहितेंच्या नेतृत्वावर मोहोर

तालुक्याच्या राजकारणावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांची वीस वर्षांहून अधिक काळापासून भक्कम पकड आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या काही वर्षांपासून त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते हेदेखील नेतृत्व करत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीसोबतच शेतकी सहकारी संघाच्या निवडणुकीतदेखील तालुक्यातील अन्य नेत्यांसह त्यांच्या प्रमुख नेतृत्वातील बळीराजा पॅनलला घवघवीत यश मिळविल्याने त्यांच्या नेतृत्वावर मतदारांनीदेखील मोहोर उमटविल्याचे दिसून येते.

तर दुसरीकडे आमदार मंजुळा गावित, भाजप ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलला मात्र मतदारांनी पुन्हा एकदा बहुमतापासून दूर ठेवले. मात्र या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी मिळविलेली मतेदेखील लक्षणीय आहेत.

बळीराजा विकास पॅनलचे विजयी उमेदवार (कंसात मते)

सर्वसाधारण मतदारसंघ : अनिल दयाराम शिंदे (१,८९८), शिरीष आनंदराव सोनवणे (१,८९१), दिनेश यादवराव सोनवणे (१,७८३),

महिला राखीव मतदारसंघ : संध्या अरुण अकलाडे (२,१८४), विमलबाई गोरखराव अहिरराव (१,९२९),

अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ : विजय साहेबराव बागूल (२,०६८), संस्था सभासद मतदारसंघ : प्रदीपकुमार किशोर नांद्रे (६४), उमाकांत लक्ष्मण बिरारीस (६५), सजन नथू पाटील (५२).

शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार (कंसात मते)

सर्वसाधारण मतदारसंघ : उल्केश उत्तमराव देसले (१,९५९), ॲड. नरेंद्र उत्तमराव मराठे (१,९४०), विलास गुलाबराव देसले (१,७७१),

इतर मागासवर्गीय मतदारसंघ : नयनेश भीमराव भामरे (२,०२५), भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदारसंघ : माणिक धोंडू मारनर (२,०१६)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT