Mendrana (Madhya Pradesh): Fire broke out at Durga Sakhar Khandsari on Tuesday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fire Accident : मेंद्राना येथील दुर्गा साखर खांडसरीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील मध्य प्रदेश राज्यातील खेतीया -सेंधवा रस्त्यावरील मेंद्राना गावाजवळील दुर्गा साखर खांडसरीला मंगळवारी (ता. ३०) दुपारी दोन-तीनच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली.

आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र लाखोंचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील शहादा, दोंडाईचा, नंदुरबार आदी ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या बंब दाखल झाले होते. (Heavy fire at Durga suger Khandsari in Mendrana Losses of millions Fire bombs have arrived from Madhya Pradesh Maharashtra along with Gujarat state Dhule News)

रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. अग्निशमन दलाचे बंब कमी पडत असल्याने गुजरात राज्यातून अग्निशमन दलाचे बंब मागविण्यात आलेत. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही.

खांडसरीच्या मागच्या बाजूला असलेला भुस्सा पूर्णपणे जळून खाक झाला. शेजारील गावांना पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासन व खांडसरीचे कर्मचारी दुपारपासून प्रयत्न करीत होते.

शहादा तालुक्याच्या पूर्व भागातील मंदाणे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा आहे. या सीमेवरून खेतीया-इंदूर हा महामार्ग जातो. या मार्गावर मध्य प्रदेश राज्यातील मेंद्राना गावाजवळ श्री दुर्गा खांडसरी शुगर मिल असून, दोन्ही राज्यातील ऊस उत्पादकांना खूप सोयीची आहे.

त्यामुळे या मिलमध्ये दर वर्षी लाखो टन उत्पादक पुरवठा करतात. त्या मुळे दर वर्षी मोठ्या प्रमाणात येथे साखरचे उत्पादन घेतले जाते. मोठी मिल असल्यामुळे येथे अधिकारी, कर्मचारी वर्गदेखील मोठ्या संख्येने कार्यरत आहे.

सध्या हंगाम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांसह शेतकरी, मजुरांची व वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. अशीच परिस्थिती आज मिलमध्ये होती. रात्रंदिवस हंगाम आवरण्यासाठी शिफ्टनुसार कर्मचारी येथे काम करत असतात. असेच काम मंगळवारी येथे सुरू होते.

काम सुरू असतानाच दुपारी दोन ते तीनच्या सुमारास मिलमध्ये अचानक आग लागली आणि आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले. दुपारी कडक ऊन असल्यामुळे आणि मिलच्या पाठीमागे भुसार असल्याने आगिने क्षणात तीव्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात येणे मुश्कील झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मिलमधील अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या समयसूचकतेने सर्व कर्मचारी, मजूर तत्काळ आपापल्या पद्धतीने सुरक्षित ठिकाणी पोचले.

काहींनी तत्काळ मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अग्निशमन दलाला फोन करीत बंब बोलावले. परिसरातील अग्निशमन बंब तत्काळ दाखल झाले.

काही बंब येणे सुरूच होते. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर मिल प्रशासन व स्थानिक शासकीय प्रशासनाकडून सूरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT