Dhule News : येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमधील दुसरीतील पुरव दीपक माळी यास ‘सबक्युट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटिस’ या दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे.
याबाबत ‘सकाळ’मध्ये पुरवच्या औषधोपचारासाठी मदतीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक दात्यांनी पहिल्याच दिवशी ७१ हजारांची मदत दिली. ( help for purav by people in dhule new )
ही मदत चार दिवसांत सव्वा लाखावर गेली आहे. जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी पुरवची भेट घेतली व एकतीस हजारांची मदत दिली. त्यांनी दीपक माळी यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेतली.
कॅनडातूनही मदत
येथील मूळ रहिवासी अन् कॅनडास्थित गोपीचंद शिंपी यांनी अकरा हजारांची मदत पाठविली.
भ्रमणदूरध्वनीवरून पुरवची विचारपूसही केली. त्यांच्या मित्रपरिवारांतूनही मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर महाले, जे. एस. भामरे, मनोज पाटील, दिनेश पाटील, सविता नरहर पाटील, सतीश विश्वासराव पाटील, जगदीश पाटील, दीपक अहिरराव, मंगेश देशमुख, किरणकुमार माळी, प्रियंका पाटील, विजय माळी, शरद चौधरी, मनोजकुमार पाटील, राजू पाटील नरडाणा आदींनीही मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.