Dhule Police Transfer : जिल्हास्तरावरील बदली सत्रामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही.
त्याचे पडसाद ‘आयजीं’च्या पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या कारवाईतून उमटत आहेत. (Hemant Patil transfer to control room dhule police transfer news)
असे असताना या पथकाने शहर परिसरात सोमवारी (ता. १८) रात्री जुगारअड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर त्यास कारणीभूत मानून पोलिस अधीक्षकांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे.
आयजींच्या पथकाची धुळे शहर परिसरात कारवाई आणि त्याअनुषंगाने एलसीबीचे निरीक्षक पाटील यांच्या बदलीविषयी पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी मंगळवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच एलसीबीची सूत्रे स्वतः हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
आयजी पथकाचा छापा
पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर-पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री शहरालगत मोराणे शिवारात जुगारअड्ड्यावर कारवाई केली. तीत २५ दुचाकी, तीन कार, तसेच दीड लाखांची रोकड जप्त केली. याप्रकरणी ३१ संशयितांना ताब्यात घेतले. मोराणे शिवारात एका हॉटेलमागे जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर-पाटील यांना मिळाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार त्यांनी विशेष पथकातील पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांना शहानिशा करून तत्काळ कारवाईचा आदेश दिला. आयजींच्या पथकाने सोमवारी रात्री आठनंतर जुगारअड्ड्यावर छापा टाकला. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी सांगितले, की एलसीबीचे कार्यक्षेत्र जिल्हाभर आहे.
त्यामुळे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. एलसीबीची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने मोराणे शिवारात कारवाई केलेला भाग धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र, या पोलिस ठाण्यात दोन ते चार दिवसांपूर्वीच निरीक्षक प्रमोद पाटील रुजू झाल्याने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
जिल्ह्यात रंगतेय शीतयुद्धाची चर्चा
आयजींच्या पथकाने शहरासह जिल्ह्यात काही दिवसांतच चार ते पाच वेळा ठिकठिकाणच्या गैरव्यवसायांवर कारवाई केली आहे. तसेच जिल्हा पोलिस दलात दीड ते दोन महिन्यांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बदली सत्र सुरू आहे. यावरून आयजी आणि पोलिस अधीक्षकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.