Horses entered in pilgrimage esakal
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra : सारंगखेडा यात्रेतील चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वप्रीमियर लीग आणि स्पर्धेचे आकर्षण

देशातील सर्वांत मोठा अश्व बाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा) येथील घोडेबाजाराला सुरवात झाली असून, या घोडेबाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे चेतक फेस्टिव्हल.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : देशातील सर्वांत मोठा अश्व बाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा) येथील घोडेबाजाराला सुरवात झाली असून, या घोडेबाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे चेतक फेस्टिव्हल.

यंदाच्या चेतक फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धा आणि प्रीमियर लीग हे राहणार आहेत.(Horse Premier league and tournament attraction at Chetak Festival in Sarangkheda Yatra nandurbar news)

महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील एकमुखी दत्त यात्रेत देशातील सर्वांत जुना अश्व बाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडेबाजाराची ओळख आहे. देशभरातून घोडे विक्रीसाठी येथे दाखल होत असतात.

घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून येथे कोट्यवधींची मोठी उलाढाल होत असते. यंदा सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत विविध प्रांतातील जवळपास हजारावर जातिवंत घोडे दाखल झाले आहेत.

जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

यात्रोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यात्रेत हजारो भाविकांची दररोज हजेरी लागते. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत यात्रास्थळी प्रत्यक्ष पाहणी न केल्याने जनमानसात नाराजी व्यक्त होते.

यात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्था, भाविकांच्या सोयी-सुविधा, मंदिर प्रशासनाचे नियोजन तसेच स्थानिक स्तरावरील नियोजन आदींची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप सारंगखेडा येथे येऊन पाहणी करून आढावा घेतलेला नसल्याने नाराजीची चर्चा सुरू आहे.

यात्रोत्सवासंदर्भात नियोजनाची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नंदुरबार येथे बैठक घेतली होती. त्यानंतर फक्त स्थानिक स्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. सारंगखेडा यात्रा व चेतक फेस्टिव्हल दोन ते तीन आठवडे चालतो. त्यात राज्यासह अन्य १४ राज्यांतील व्यापारी येथे येतात. गेल्या वर्षी २० लाखांहून अधिक यात्रेकरूंची हजेरी होती.

अनेकदा अधिकाऱ्यांकडून मांढरदेवी यात्रोत्सवाच्या दुर्घटनेची आठवण करून दिली जाते; परंतु येथे येणाऱ्या भाविक, यात्रेकरू, व्यापारी, खरेदीदार यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाहणी करणे आवश्यक असल्याचा सूर जनमानसात उमटत आहे.

'‘या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धानां देशभरातील अश्वप्रेमी हजेरी लावत असतात. यंदा चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांच्या स्पर्धांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अश्वशौकिनांची अश्व पाहण्यासाठी येथे दररोज हजेरी लागते. आपल्याला अश्वशक्तीच्या अनुभव घ्यायचा असेल, किमती घोडे पाहायचे असतील, तर एक वेळ सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला भेट द्यावी.’'- जयपालसिंह रावल, अध्यक्ष, चेतक फेस्टिव्हल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT