Farmer Gulab Patil filling monsoon millet in his house. (Photo: Jagannath Patil) esakal
उत्तर महाराष्ट्र

Increased Rates: अबब...! बाजरीचे भाव प्रती Quintal 3000

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : जुलैपासून सतत पाऊस आणि पाऊसच कोसळत आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले. कडधान्याचा हंगाम आलाच नाही. बाजरी व कापसाचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका बाजरीला बसला. बाजरीचे उत्पादन घटले. बाजरीचे क्षेत्रही कमीच असल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला.

ग्रामीण भागात बाजरी मिळेल का बाजरी असे एकमेकांना विचारले जात. बाजरीच्या कमतरतेमुळे एक हजार आठशेवरुन तब्बल प्रती क्विंटल तीन हजारावर बाजरीचे भाव पोचले आहे. यामुळे बाजरीला पसंत करणाऱ्यांनी बाजरी घेण्याचे प्रमाण निम्म्यावर आणले आहे. (huge increase in rates of Bajra cotton due to heavy rain dhule news)

पावसाने नुकसान अन क्षेत्रही कमी

दरवर्षी मका आणि कापसाचे क्षेत्र वाढतेच आहे. नगदी उत्पादन म्हणून या पिकांकडे पाहिले जात आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढले जात आहे. त्या तुलनेत बाजरीचे क्षेत्र आणि उत्पादनही घटले आहे.

चारा अधिक उपयुक्त नाही. भावही नाही. परिणामी बाजरीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्षच होते आहे. यंदा पावसानेही मोठे नुकसान केले आहे. बाजरीला धान्य फुटल्यानेही नुकसान झाले.

धुळ्याच्या बाजारात २३०० चा भाव

धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीची आवक काही क्विंटल होत आहे. त्या तुलनेत भाव कमीच आहे. बाजरीची गुणवत्ताही कारणीभूत आहे. गेल्यावर्षी १७०० ते १८०० असणारी बाजरी दोन हजार ३०० वर पोचली आहे.

उत्पादनावरील खर्च निघणे अवघड

ग्रामीण भागात गुणवत्ता असलेली व दर्जेदार बाजरीला मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे शहरात राहणारे थेट गावात येऊन, बाजरी आहे का बाजरी, विकत घ्यायची आहे का बाजरी, अशी विचारपूस करीत आहेत.

बाजरीच्या कमतरतेतून भाव वाढला आहे. तब्बल प्रती क्विंटल तीन हजाराने खरेदी केली जात आहे. शेतकरी अधिक भावाने सुखावला असेलही. मात्र त्याच्याकडे तेवढे उत्पादन नसल्याने उत्पादनावरीलही खर्च निघणार नसल्याचे कटू सत्य आहे.

"सातत्यपूर्ण पाऊस राहिला नसता तर अधिक बाजरी पिकली असते. बऱ्यापैकी भाव आहे. मात्र अजून बाजरी विकायची नाही.'-गुलाब पाटील, बाजरी उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT