Maha DBT sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: आश्रमशाळेतील शेकडो आदिवासी विद्यार्थी डीबीटीपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तळोदा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या काही शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून डीबीटी मिळालेली नाही, ती मिळावी यासाठी बिरसा फायटर्सने प्रकल्प अधिकारी तळोदा यांच्यासह मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, अपर आदिवासी आयुक्त नाशिक यांना निवेदन देऊन राहिलेल्या विद्यार्थ्यांना डीबीटी त्वरित देण्याची मागणी केली आहे. (Hundreds of tribal students in ashram schools deprived of DBT Nandurbar News)

निवेदनाचा आशय असा ः आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते; परंतु तळोदा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शिर्वे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांना अद्यापही डीबीटी न मिळाल्याची धक्कादायक माहिती मिळाली.

संबंधित मुख्याध्यापकांना फोन करून माहिती घेतली असता, दुसऱ्या आश्रमशाळेतून दहावी पास होऊन अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एटीसी अपर आदिवासी आयुक्त, नाशिक यांनी आमच्या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन ट्रान्स्फर न केल्यामुळे डीबीटी अद्यापही मिळाली नाही, असे सांगण्यात आले.

गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांना शालेय व दैनंदिन वस्तू खरेदीसाठी अद्यापही डीबीटी न मिळणे ही दुर्दैवी बाब आहे. संबंधित विभाग व आश्रमशाळेचे इतके दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

अशीच परिस्थिती जिल्ह्यातील काही आश्रमशाळांत व वसतिगृहांत राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांची तक्रार आहे. तसेच बऱ्याच आश्रमशाळांत अध्यापन करण्यासाठी विषय शिक्षक नसल्याचे म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्वरित विषय शिक्षकांचीही नेमणूक करण्याची मागणी केली आहे. प्रश्न त्वरित सोडवावेत अन्यथा विद्यार्थी पालक व संघटनेमार्फत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निवेदनावर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण, आदिवासी उत्सव समितीचे रणजित पाडवी, बिरसा फायटर्स विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,

जिल्हाध्यक्ष भरत पावरा, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी, कार्याध्यक्ष किरण पाडवी, रणजित पाडवी, सहसचिव सतीश पाडवी, सहसंघटक कालूसिंग पावरा, जिल्हा सदस्य चुनिलाल पाडवी, गंगानगर शाखाध्यक्ष रायसिंग पाडवी, रापापूर-पाल्हाबार सल्लागार गणेश पाडवी, चंद्रसिंग पाडवी, जगन मोरे, विलास वसावे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

"विद्यार्थ्यांना शालेय व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी डीबीटी वेळेवर मिळणे आवश्यक आहे; परंतु दोन वर्षांनंतरही शेकडो विद्यार्थ्यांना डीबीटी मिळत नाही हे दुर्दैव आहे. संबंधित विभाग व आश्रमशाळेने विद्यार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवू नये. राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित डीबीटी मिळावी." -राजेंद्र पाडवी, बिरसा फायटर्स, राज्य महासचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT