Maratha community members during a chain hunger strike outside the office of the district magistrate to get reservation for the Maratha community. esakal
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू; मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे लोण महाराष्ट्रात पसरले असून, विविध ठिकाणी उपोषण व आंदोलने केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहादा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज शहादा तालुका यांच्यातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.( hunger strike started for Maratha reservation in shahada nandurbar news)

साखळी उपोषणाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून करण्यात आली. शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारपासून साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली. तीन दिवस साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

प्रशासनाला दिलेला निवेदनात म्हटले आहे, की सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत. अनेक वर्षांपासून वंचित राहिलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागास राहिलेला आहे.

राज्यातील सर्वांत मोठा बहुसंख्य समाज असूनसुद्धा या समाजातील असंख्य युवक रोजगारापासून वंचित राहिलेले आहेत. यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागास राहिलेला आहे. अनेक तरुण गरिबी व बेरोजगारीमुळे आत्महत्या करीत आहेत. असे अनेक प्रश्न समाजाला भेडसावत असून, शासनाने तत्काळ सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासनाने आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ३० दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र ४० दिवस होऊनही आरक्षणावर ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्रभर मराठा समाजातर्फे आंदोलने, निदर्शने करण्यात येत आहेत. आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी अन्न व पाणी त्यागल्याने त्यांची तब्येत खालावत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजबांधवांना त्यांची काळजी आहे. म्हणून शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी समाजातर्फे करण्यात येत आहे.

एन. डी. पाटील, चतुर्भुज शिंदे, ॲड. सरजू चव्हाण, सागर मराठे, नीलेश मराठे यांसह समाजबांधवांनी सकाळी नऊपासून साखळी उपोषणाला सुरवात केली. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणस्थळी अनेक राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आदींनी येऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT