crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : नवापाडा येथे छाप्यात दीड लाखाचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शनिवारी (ता. २८) अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा येथे छापा टाकून एक लाख ६१ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला.

डोडवा येथील स्मशानभूमी परिसरात कुवरसिंग पाडवी (रा. नवापाडा, ता. अक्कलकुवा) याने विनापरवाना अवैध मद्यसाठा बाळगून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यात आली. (illegal honey seized in raid at Nuapada nandurabr crime news)

या प्रकरणी आरोपी फरारी असून, कारवाईत २४ खोके मुद्देमाल जप्त करण्यात आला. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा पोलिस नाईक कुवरसिंग नाईक यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुमानसिंग पाडवी तपास करीत आहेत.

नवापाडा (ता. अक्कलकुवा) येथे तीन महिन्यांतील ही दुसरी कारवाई आहे. अवैध धंदे करणाऱ्यांनी तस्करी करण्यासाठी नवापाडा येथे झुपे गोडाउन तयार केले असून, रात्रीच्या सुमारास गुजरातमध्ये तस्करी होत असते.

अवैध मद्यविक्री थांबेना

अक्कलकुवा तालुका गुजरातच्या सीमावर्ती भागात येतो. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने नावापाडा व तीनखुन्या या गावांत अवैधरीत्या मद्यसाठा करून रात्रीच्या काळोखात गुजरातमध्ये तस्करी केली जात आहे. वारंवार कारवाई करूनही अवैध मद्यसाठा आढळून येत असल्याने अशा अवैध विक्रेत्यांना कायद्याच्या धाक नसल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

Amravati: उत्तरप्रदेशचे पडसाद महाराष्ट्रात; रात्री हिंसक जमावाने पोलीस स्टेशनवर केला हल्ला, 29 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates : राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार, कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होणार अनावरण

मुख्यमंत्र्यांचे विमान उतरणार सोलापूर विमानतळावर! वचनपूर्ती सोहळ्यादिवशी शहरातील ‘हे’ मुख्य रस्ते राहणार बंद; लाभार्थी महिलांना घेवून आलेल्या बस ‘येथे’ थांबणार

Sharad Pawar: वस्तादाची खेळी सुरुच, आणखी एक आमदार 'तुतारी' फुंकणार? शरद पवारांची ताकद वाढणार!

SCROLL FOR NEXT