Agriculture Department officials inspecting stock of fake fertilizers in warehouse at MIDC.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fake Fertilizer Case : धूळफेकीसह फसवणुकीचा कळस! फॉस्पो जिप्समची तब्बल बाराशे रुपयांवर विक्री

निखिल सूर्यवंशी

Dhule Fake Fertilizer Case : गुजरातमधून फॉस्पो जिप्सम (ग्रॅन्युअल) फक्त दोन रुपये किलोने खरेदी करायचे आणि बनावट खताची प्रती ५० किलो गोणी तब्बल एक हजार २३५ रुपयांना विक्री करण्याचा गैरउद्योग येथील कृषी यंत्रणेने उजेडात आणला.

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात या बनावट खतसाठ्याद्वारे शेतकऱ्यांची धूळफेक करण्यात आली आहे. यातील संशयितांनी शेतकरी व शासनाच्या फसवणुकीचा कळस गाठत केंद्रासह राज्य सरकारच्या शेतकरीहिताच्या धोरणाला हरताळ फासला आहे.

त्यामुळे या प्रकरणी कृषी आयुक्तांसह राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ( illegal industry of selling 50 kg bags of fake fertilizer for Rs 1200 dhule fake fertilizer case news)

एमआयडीसीतील खासगी भाडेपट्ट्याच्या गुदामात तब्बल १३ लाख ३५ हजार किमतीचा बनावट खतसाठा व काही साधने आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी ८ जुलैला भूमी क्रॉप सायन्सचा चालक नरेंद्र श्रीराम चौधरी (रा. धुळे), बनावट खतपुरवठा करणारी गुजरातमधील मे. फार्म सन्स फर्टिकम प्रा. लि. (सुरत), बनावट खत पॅकिंगसाठी वापरातील गोण्यांवर नावाची छपाई असलेल्या मे. ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि. (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) या संशयित तिघांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छाप्यानंतरचे प्रश्‍न

फिर्यादीत १८ः१८ः१० या खताच्या ब्रॅड नेममध्ये कृषी राजा, कृषी सम्राट, तसेच काही दाणेदार खत बनावट स्वरूपाचे असल्याचा उल्लेख करत तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यात फॉस्पो जिप्सम असल्याचा संशय व्यक्त झाला आहे. या प्रकाराचा मागोवा घेतला असता, फॉस्पो जिप्सम गुजरातमधून फक्त दोन रुपयांत विक्री केले जाते.

ते खरेदी करत गुन्ह्यातील संशयितांनी संगनमताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल एक हजार २३५ रुपये प्रती ५० किलो गोणीप्रमाणे विक्री केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. याबाबत मोहाडी पोलिस तपासाला कशी दिशा देतात? यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असेल. शिवाय या घटकासह राज्य शासनाची कशी आर्थिक फसवणूक केली गेली, ते तपासातून पुढे आणावे लागेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छाप्यानंतर पोलिसांनी बनावट खतखरेदी व विक्रीच्या गैरउद्योगाबाबत अनुमानीत केलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात किती गोण्या विक्री झाल्या, किती ट्रक गुजरातमधून आले आणि त्यातील बनावट खतसाठा कुठल्या वाहनांनी किती तालुक्यात वितरित केला, यातून कोट्यवधींच्या उलाढालीत कोणी हात ओले केले याचा शेतकरीहितासाठी पोलिसांना गांभीर्याने तपास करावा लागणार आहे.

कृषी आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

फॉस्पो जिप्सममुळे येथील बनवाट खतसाठ्याच्या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणी छाप्यातून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास पोलिसांच्या तपासात आणि कृषी आयुक्तांनी चौकशी हाती घेतल्यास अनेक प्रश्‍नांना तोंड द्यावे लागणार आहे.

खरिपातील तीन महिने या कार्यालयापासून सात किलोमीटरवर राजरोस बनावट खताचा गैरउद्योग सुरू होता. त्याचा बदलीतून दहा ते बारा दिवसांपूर्वी येथे

रुजू झालेल्या कृषी अधिकाऱ्यांना सुगावा लागतो. मात्र, बदलीपूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी निगडित संबंधित अधिकाऱ्यांना का सुगावा लागत नाही, हे कृषी आयुक्तांच्या चौकशीतून समोर येऊ शकेल, असे शेतकऱ्यांना वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT