Additional Superintendent of Police Nilesh Tambe, Police Inspector Rahul Kumar Pawar and police personnel along with the illegal liquor seized from Koparli and brought to Nandurbar Taluka Police Station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : कोपर्लीतून 42 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोपर्ली (ता. नंदुरबार) येथे वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या मागील बाजूस असलेला ४२ लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी जप्त करीत दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई शनिवारी रात्री अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी पोलिस ताफ्यासह केली. (Illegal liquor stock worth 42 lakh seized from Koparli Nandurbar Crime News)

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

कोपर्ली (ता. नंदुरबार) येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या पुढे मोठी भिलाटीत पत्र्याचे दरवाजा असलेल्या व हाफ लोखंडी शटर असलेल्या बंद घरात बेकायदा अवैध देशी-विदेशी दारूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना शनिवारी सायंकाळी मिळाली होती. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक तांबे यांना ही माहिती कळविली. त्यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना पोलिसपथक

तयार करून तत्काळ कारवाईबाबत सांगितले.

पोलिस पथकाने कोपर्लीत जाऊन बंद घराचा मालक प्रल्हाद मधू पवार (वय २९, रा. कोपर्ली) याला बोलावून घेतले. घराचे कुलूप उघडून पाहिले असता तेथे खाकी रंगाच्या खोक्यांमध्ये अवैध मद्यसाठा आढळला. याबाबत प्रल्हाद पवार याला विचारणा केली असता त्याने सतू भिल ऊर्फ सत्तार ठाकरे (रा. म्हसावद, ता. शहादा) याची असल्याचे सांगितले. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात प्रल्हाद मधू पवार व सतू भिल ऊर्फ सत्तार ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT