Due to the record arrival, there was a rush in the market committee.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेतमालाचे लिलाव; शिरपुरला डॉलर हरभरा, मिरची तेजीत!

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : येथील बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.२७) शेतमालाची विक्रमी आवक झाली. डॉलर हरभरा आणि मिरचीला उच्चांकी भाव मिळाला. अतिरिक्त माल येऊन पडल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मालाचे लिलाव सुरु होते. (in market committee on 27 march Dollar gram and chilli fetch high prices dhule news)

बाजाराचा दिवस असल्याने बाजार समितीमध्ये गर्दी होईल अशी अटकळ होती. मात्र विक्रमी सात हजार ६७४ क्विंटल शेतमाल घेऊन आलेली ट्रॅक्टर्स, बैलगाड्या, लहानमोठी मालवाहू वाहने, जनावरांची वाहतूक करणारे ट्रक यांच्या गर्दीने बाजार समितीला अक्षरश: यात्रेचे स्वरुप आले. शेतमाल ठेवण्यासाठी व वाहनांना जागा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु होती.

बाजार समितीच्या आवारातील सहायक निबंधक कार्यालयाकडे जाणारा रस्ता वाहनांच्या गर्दीमुळे बंद झाला होता. बाजार समितीवरूनच करवंद नाका ते बीएसएनएल ऑफिसचा बायपास रस्ता आहे. तेथून ये-जा करण्यासाठी पादचाऱ्यांनाही जागा मिळत नव्हती. अशा परिस्थितीतच शेतमालाचे लिलाव सुरु होते.

बाजार समितीमध्ये लोकवन गव्हाची विक्रमी दोन हजार ६१५ क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान एक हजार ९७३ तर कमाल दोन हजार ५५२ रुपये दर मिळाला. पाठोपाठ दादरची एक हजार ९८२ क्विंटल आवक झाली. दादरला किमान तीन हजार २७६ तर कमाल चार हजार ३७६ रुपये दर मिळाला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पीकेव्हीटू वाणाच्या हरभऱ्याची ९०५ क्विंटल आवक झाली. त्याला किमान साडेसहा हजार तर कमाल सात हजार ४२५ रुपये भाव मिळाला. यंदाच्या हंगामात डॉलर हरभरा तेजीत असून त्याची ३४२ क्विंटल आवक झाली. या वाणाला किमान आठ हजार ७०१ तर कमाल दहा हजार ७७६ रुपये भाव मिळाला. सुक्या मिरचीला किमान १९ हजार ३५० रुपये तर कमाल २४ हजार २५० रुपये भाव मिळाला.

अन्य शेतमाल व कंसात त्याला मिळालेला किमान व कमाल दर असा : तूर (७०००-७६५१ रुपये), गावरान हरभरा (३९०१-४८०१ रुपये), गुडलक हरभरा (५४००-६१०० रुपये), बाजरी (१९११-२८५० रुपये), मका (२०२९-२०४९ रुपये), सूर्यफूल (५००० रुपये), सोयाबीन (४७५० रुपये), मोहरी (५०२५ रुपये).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT