Dhule Farmer Work: Chandrasekhar Bawankule, Power over Mahajan Hakka esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipalty News : 7 कोटींच्या उद्यानाचे शनिवारी लोकार्पण; भूलभुलय्या, लेझर शोचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipalty News : महापालिकेतर्फे सुमारे सात कोटी रुपये खर्चातून साकारलेल्या पांझरा नदीकिनाऱ्यावरील चौपाटी येथील उद्यानाचा लोकार्पण सोहळा २५ नोव्हेंबरला सायंकाळी सहाला होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण होईल.( Inauguration ceremony of park at Chowpatty on Panzara river on November 25 dhule news )

भाजपचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल, महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आमदार फारूक शाह, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे उपस्थित असतील.

उपस्थितीचे आवाहन

उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमाला शहरातील नागरिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, आयुक्त अमिता दगडे-पाटील, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, सभागृहनेत्या भारती माळी, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, उपसभापती विमल पाटील, उद्यान असलेल्या प्रभागातील नगरसेवक तथा माजी उपमहापौर नागसेन बोरसे, नगरसेविका पुष्पा बोरसे, नगरसेवक कांतिलाल दाळवाले आदींनी केले आहे.

भूलभुलय्या, लेझर शो

शासनाच्या मूलभूत सेवासुविधा निधी व मनपा विकास शुल्क निधीतून पांझरा नदीकिनारी चौपाटी येथील उद्यानाचे काम महापालिकेने हाती घेतले. शासनाच्या मूलभूत सेवा सुविधा निधींतर्गत सुमारे पाच कोटी व धुळे मनपा विकास निधींतर्गत सुमारे दोन कोटी अशा एकूण सात कोटी निधीतून हे उद्यान पूर्णत्वास आले आहे.

उद्यानात जॉगिंग ट्रॅक, कारंजा, वृक्षलागवड, भूलभुलय्या, विद्युत व्यवस्था आदी विविध कामे करण्यात आली आहेत. या नूतन उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे खानदेशातील एकमेव लेझर शो या ठिकाणी बसविण्यात आला आहे. विविध रंगांत हा लेझर शो संगीतावर चालणार आहे.

लेझर शो उद्यानाचे प्रमुख आकर्षण असून, लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी धुळेकर नागरिकांसाठी मोफत दाखविला जाणार आहे. सुमारे साडेतीन ते चार एकर परिसरातील हे उद्यान धुळे शहरातील आबालवृद्धांसाठी आकर्षण ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading: दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगला कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Aslam Sheikh Education: "आधी बारावी अन् मग नववी..." काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या शिक्षणावरुन गोंधळ; भाजपच्या आरोपामुळे खळबळ

Diwali Rangoli Designs: यंदा दिवाळीत अंगणात काढा 20 मिनिटांत फुलांची सुंदर रांगोळी , सर्वजण करतील कौतुक

Vidhansabha Nivadnuk 2024: काका-पुतणे झाले, आता महाराष्ट्र पाहणार मामा-भाच्याची लढत; कुठे रंगणार सामना? कोण मारणार बाजी?

Morning Breakfast: दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी घरीच बनवा चवदार स्वीट उत्तप्पा, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT