BJP,Shivsena,Ncp, Congress Election Esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Politics News : कार्यकर्त्यांपुढे एकच सवाल... आता माझं काय अन् कसं होईल?

सम्राट महाजन

तळोदा (जि. नंदुरबार ) : साधारणतः एखाद्या मातब्बर नेत्याने पक्ष सोडल्यावर त्या पक्षाची राजकीय गणिते बिघडत असतात. (Instability among political leaders due to party switching of senior leader nandurbar politics news)

तळोद्यातही माजी नगराध्यक्ष भरत माळी यांनी पक्ष सोडल्यामुळे त्यांनी सोडचिठ्ठी दिलेल्या संबंधित पक्षावर परिणाम झालाच आहे, त्याचबरोबर नव्याने प्रवेश केलेल्या पक्षाची व इतर पक्षांची राजकीय गणितेदेखील बिघडली आहेत. त्यामुळे शहरात राजकीय अस्वस्थता वाढली असल्याचे बोलले जात आहे. सर्वांना ‘आता माझं काय अन् कसं होईल’ हा एकच प्रश्न सतावत आहे.

तळोद्यातील भरत माळी ३० वर्षांपासून शहराच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. यादरम्यान झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. अशा या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या नेत्याने काँग्रेस (Congress) पक्षाला रामराम ठोकत नुकताच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे तळोद्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या पक्षप्रवेशाची कुजबूज ऐकायला मिळत आहे.

महाविकास आघाडीला धक्का

भरत माळी यांच्यासारखा तोलामोलाचा नेता काँग्रेसला सोडून गेल्यामुळे शहरात काँग्रेसची अत्यंत कमजोर अवस्था झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व कोण करेल? काँग्रेसला तगडे उमेदवार मिळतील का, असा प्रश्न काँग्रेस समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तसेच राष्ट्रवादी (NCP) , उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचीदेखील शहरात बऱ्यापैकी ताकद आहे. काँग्रेसला पर्यायाने भरत माळी यांना सोबत घेऊन भाजपला टक्कर देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीलादेखील (Mahavikas Aghadi) या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. माळी भाजपत गेल्याने आता महाविकास आघाडीला संपूर्ण शहराचे नेतृत्व करू शकेल असा दुसरा मोठा चेहरा शोधावा लागणार आहे.

संधी मिळेल का?

तळोद्यात भाजपची पूर्वीपासूनच ताकद आहे, अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांना व अलीकडच्या काळात इतर पक्षांमधून भाजपत आलेल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्ये तिकिटांची अपेक्षा आहे. मात्र सर्वांच्या मनात आता चलबिचल सुरू झाली आहे.

कारण माळी यांचे राजकीय वजन पाहता भाजपत त्यांच्या निर्णयाला किंमत राहील, तसेच तेदेखील त्यांच्या समर्थकांची विविध ठिकाणी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला संधी मिळेल का, असा प्रश्न तिकिटांसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.

भाजप स्वीकारेल का?

माळी यांनी जरी भाजपत प्रवेश केला असला, तरी मात्र एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेससोडून भाजपमध्ये आलेले भरत माळी व त्यांच्या समर्थकांनादेखील एक वेगळाच प्रश्न सतावत आहे. भाजपचे जुने पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्याला खरोखर स्वीकारतील का व आपल्याला मनापासून साथ देतील का, असा प्रश्न माळी व त्यांच्या समर्थकांना नक्कीच पडत असेल.

पाडापाडीचे राजकारण रंगणार

तळोदा भाजपत पूर्वीपासून असलेले गट-तट व इतर पक्षातून भाजपत आलेले कार्यकर्ते यांच्यामधील असलेला सुप्त संघर्ष पाहता पुढील निवडणुकांमध्ये भाजपमध्येच पाडापाडीचे राजकारण रंगणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT