esakal
उत्तर महाराष्ट्र

Board Exam : कायदा मोडण्याचे काम करू नका; परीक्षा संचलनासाठी सूचना

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा (जि. धुळे) : शिक्षण मंडळाने परीक्षा (Exam) संचलनासाठी दिलेल्या सूचनेचे पालन करावे. केंद्र संचालकांनी सूचनेचे वाचन करावे. कायदा पाळण्याऐवजी कायदा मोडण्याचे काम करू नका. कॉपी केस झाली तर केंद्र संचालकांवर जबाबदारी निश्चित करू.

परीक्षेच्या कार्यपद्धतीचा योग्य अवलंब करावा. अशा स्पष्ट सूचना नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिल्या. (instructions given by Board of Education for conduct of examination Don't break the law dhule news)

येथील हस्ती बहुउद्देशीय भवनात धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील दहावी, बारावी परीक्षेच्या केंद्र संचालकांची शुक्रवारी (ता. १०) दुपारी बैठक झाली. या वेळी सहसचिव डॉ. राहुल चौधरी, धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम आदी उपस्थित होते.

राजेंद्र अहिरे म्हणाले, प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या परिक्षकाची शूटिंग होईल. थेट परीक्षा केंद्रावर जाई पर्यंत जीपीएस मार्फत यंत्रणेला समजणार आहे. परीक्षा कडक, निकोप निर्भीड वातावरणात होईल याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी. संबंधित पोलिस ठाण्यात, वीज कंपनीच्या अभियंता यांना पत्र व्यवहार करून ठेवा. असे त्यांनी नमूद केले.

सहसचिव डॉ. राहुल चौधरी म्हणाले, परीक्षेचे कामकाज करताना परीक्षा पूर्व काम, परीक्षा दरम्यानचे काम, परीक्षोत्तर काम असे तीन टप्प्यांचे नियोजन करावे. स्थानिक पातळीवर दक्षता समितीची बैठक घ्यावी. तसेच, परीक्षा यंत्रणेत काम करणाऱ्यांना ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, इयत्ता बारावीचे धुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्र संख्या ४५ तर एकूण विद्यार्थी २३८८९ संख्या प्रविष्ट होणार आहे. इयत्ता दहावीचे केंद्र संख्या ६६ तर विद्यार्थी संख्या २८४४७ प्रविष्ट झाली आहे. इयत्ता बारावीचे नंदुरबार जिल्ह्यातील २७ परीक्षा केंद्र तर विद्यार्थी १६७३९, इयत्ता दहावीचे ४८ केंद्रावर २०३६१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहे.

नांदेड पॅटर्न लागू : देसले

शिक्षणाधिकारी मोहन देसले म्हणाले, नांदेड पॅटर्न राज्यभर लागू झाला आहे. यंदा होणारी परीक्षा सर्वच यंत्रणेची आहे. प्रत्येक केंद्रावर पथक पूर्ण वेळ थांबेल. परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नसल्याचा जागर जिल्हा प्रशासनाकडून होणार आहे. श्री. कदम म्हणाले, कॉपी करणे, कॉपी करू देणे हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याला अधू करण्यासारखे आहे.

कॉपीमुक्तची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना द्यावी. मोबाईल ,डिजिटल घड्याळ परीक्षा आवारात वापरता येणार नाही यासाठी जनजागृती करावी पालकांशी संवाद साधावा असे त्यांनी नमूद केले. बैठक संयोजनासाठी मंडळाचे प्रतिनिधी कैलास नागपुरे, संजय बोरसे, नूतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ए. डी. पाटील, प्रा. डी. एम. चौधरी, विश्र्वास पाटील, आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT