Interview for Army Officer Pre Training held at 19 May Dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सैन्यदल अधिकारी पूर्व प्रशिक्षणासाठी मुलाखतींचे या तारखेस धुळ्यात आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदाच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Interview for Army Officer Pre Training held at 19 May Dhule news)

या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतीला विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील यांनी केले आहे.

सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी २९ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक-५३ साठी प्रशिक्षण देण्यात येईल. एस.एस.बी प्रवेशासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी परीक्षा (एनडीए) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे.

एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उमेदवार पास झालेला असावा. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी नियुक्तिपत्र असावे. तसेच विद्यापीठ एन्ट्री स्कीमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस यादीत नावे असणारे उमेदवार पात्र राहतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुलाखतीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे १९ मेस सकाळी अकराला उपस्थित राहावे.

मुलाखतीस येताना विद्यार्थ्यांनी https://www.facebook.com/DSW.Maharashtra या फेसबुकवरील वेबपेजवर सैनिक कल्याण विभाग, पुणेवर सर्च करून त्यामधील एसएसबी-५३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पूर्ण भरून सोबत आणावी. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक

०२५३-२४५१०३२, ईमेल pctcoic@yahoo.in वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT