Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सफाई कर्मचाऱ्यांच्या गणवेशवाटपाला मुहूर्त कधी? इतर आवश्‍यक साहित्याबाबतही बोंबच..

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना गणवेशवाटपाचा प्रश्‍न गेल्या अनेक महिन्यांपासून भिजत पडला आहे. कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठी महापालिकेकडून कपडा खरेदीही झाली आहे. (issue of distribution of uniforms to municipal sanitation workers has not solved for past several months dhule news)

अनेक कर्मचारी कपडे शिवण्यासाठी टेलरकडे मापेही देऊन आल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यापुढे गाडी सरकलेली नाही. एकीकडे सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश असायला हवा यासाठी पदाधिकारी, नगरसेवक आग्रह धरतात. दुसरीकडे त्यांना गणवेशवाटपच होत नाहीत. त्यामुळे नेमके घोडे कुठे अडले आहे, हा प्रश्‍न आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश दिला जातो. साधारण सहा महिने, वर्षभरापूर्वी गणवेश खरेदीचा विषय मंजूरही झाला. त्यानुसार महापालिकेने कपडा खरेदीही केली. त्यानंतर मात्र हा विषय पुढे सरकलेला दिसत नाही. एव्हाना कर्मचाऱ्यांना कपडेवाटप व्हायला हवे होते. मात्र, घोडे अडलेलेच आहे.

खरेदी झालेला कपडा महापालिकेच्या जुन्या इमारतीत पडून आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी कपडे शिवण्यासाठी टेलरकडे मापेही दिली आहेत. मात्र, महापालिकेकडून कपडाच वितरित होत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कपडे शिवले जात नाहीत. महिला कर्मचाऱ्यांना गणवेशाच्या साड्या दिल्या जातात.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्या वाटप होत नाहीत अशी स्थिती आहे. एकीकडे पदाधिकारी, नगरसेवक सफाई कर्मचारी कोण हेच ओळखता येत नाही, त्यामुळे त्यांना गणवेश सक्तीचा करण्याची मागणी केली जाते. मात्र, महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना गणवेशवाटपात दिरंगाई होते त्याचे काय हा प्रश्‍न आहे.

इतर साहित्याचीही बोंबाबोंब

सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट आदी साहित्यही वितरित होणे आवश्‍यक असते. मात्र, तेही यापूर्वी कधी झाले ते सांगणे कठीण आहे. आता पावसाळा सुरू होईल त्यामुळे नालेसफाईसह इतर कामांसाठी या साहित्याची कर्मचाऱ्यांना गरज भासणार आहे.

पावसाळ्यापूर्वी त्यांना हे साहित्य मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, तशी कार्यवाही महापालिकेकडून होताना दिसत नाही. सफाई कर्मचाऱ्यांकडून केवळ कामाची अपेक्षा केली जाते. मात्र, त्यांच्या गरजांची पूर्तता करताना चालढकल केली जात असल्याचेच पाहायला मिळते.

डस्टबिन गेले कुठे?

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात मंजूर निधीतून महापालिकेने डस्टबिन खरेदी केले होते. स्वच्छ सर्वेक्षण व इतर अभियानांतर्गत शहरात काही ठिकाणी हे डस्टबिन बसविण्यात आले होते. उर्वरित डस्टबिन पडून होते. त्यांचे पुढे काय झाले किंवा काय होणार आहे याबाबतही कुणीही बोलत नाही. लाखो रुपये खर्च करून हे साहित्य खरेदी केले जाते. नंतर ते उपयोगाशिवाय केवळ धूळखात पडून राहत असेल तर ते खरेदी का केले, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT