Jain Muni Murder Case : जैनधर्मीय गुरू आचार्य कामकुमारनंदजी महाराज यांची हिरगुडी आश्रम (ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) येथे अमानुष हत्या झाली. या घटेनचा सकल जैन समाजाने गुरुवारी (ता. २०) काळ्या फिती लावून मूकमोचाद्वारे तीव्र निषेध केला.
घटनेचा तपास करून मारेकऱ्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी एकवटलेल्या जैन समाजबांधवांनी केली. याबाबत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. (Jain community united to protest killing of Munishree through silent march dhule news)
शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील जैन स्थानकापासून मूकमोर्चाला सुरवात झाली. प्रत्येकाने काळ्या फिती लावल्या होत्या. तसेच घटनेचा निषेध व विविध मागण्यांचे फलक मोर्चात होते. जे. बी. रोड, शहर पोलिस चौक, कराचीवाला खुंटमार्गे जुनी महापालिकला, झाशी राणी पुतळा, नवीन महापालिकेमार्गे क्युमाईन क्लब येथे मोर्चा दाखल झाला.
आम्ही अहिंसामार्गी जैन धर्मीय आहोत. जैन धर्मीय गुरु, साधू व आचार्य यांचे जीवन नि:स्वार्थी, निष्कलंक आणि अहिंसावादी राहते. असे असतानाही पाच जुलैला जैन धर्मीय आचार्य कामकुमारनंदजी महाराज यांची हिरगुडी आश्रम येथे अमानुष हत्या झाली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. हत्येचे कृत्य दहशतवादापेक्षाही भयंकर स्वरूपाचे आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. जैन समाज भगवान श्री महावीरांनी सांगितल्याप्रमाणे ‘जियो और जिने दो’ आणि अहिंसाच्या मार्गावर चालतो.
त्यामुळे मारेकऱ्यांची सुटका होता कामा नये, अशी मागणी मोर्चेकरी कांतीलाल चोरडीया, राजेंद्र कटारिया, मूलचंद संघवी, सुनील मुथा, प्रमोद जैन, भरत जैन, दिलीप पारख, संतोष पाटणे, विजय कांकरिया, किशोर शाह, राजेश बाफना, अॅड. राजेश मुणोत, विखिल शामसुखा, तुषार बाफना, कमलेश गांधी, अॅड. मोहन भंडारी, सुभाष कोटेचा, वर्धमान संघवी, पारस दुग्गड, रमेश बोथरा, सचिन कोठारी आदींसह श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, श्री भगवान शीतलनाथ संस्थान, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा आदींनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.