PM Modi esakal
उत्तर महाराष्ट्र

Taloda Assembly Constituency : तळोद्यात भाजपला अति आत्मविश्वास नडला! उमेदवाराला मिळालेला लीड गेल्यावेळेपेक्षा निम्म्यावर

सम्राट महाजन

Taloda Assembly Constituency : सध्याच्या घडीला तळोदा शहरात भाजपची मजबूत पकड आहे. मात्र असे असताना लोकसभा निवडणुकीत भाजपला जरी शहरातून लीड मिळाला, परंतु तो लीड गेल्यावेळेपेक्षा निम्म्यावर आलेला आहे. याला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा अति आत्मविश्वास कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

त्यामुळे शहरातून मोठा लीड मिळवून देऊ, अशी वल्गना करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या भ्रमाचा बुरखा फाटला असून मिळालेला लीड हा खरोखरच अपेक्षेइतका आहे का, याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. (jalgaon BJP over confidence in Taloda assembly constituency affect loss in loksabha)

मागील इतिहास पाहता नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसच्या बालेकिल्ला मानला जातो. अपवादात्मक स्थिती सोडता खासदार, आमदार, नगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्याच वरचष्मा राहिलेला आहे. मात्र तळोदा शहर व तालुका त्याला अपवाद आहे.

तळोदे शहरात तसेच तालुक्यात भाजपला मानणारा वर्ग पूर्वीपासून आहे. त्यातल्या त्यात गेल्या दहा वर्षांपासून परिस्थिती बदलली असून अलीकडच्या काळात भाजपात झालेले इन्कमिंग पाहता तळोदा शहर, तालुका पूर्णपणे भाजपमय झालेला दिसून येतो आणि शहरातून व तालुक्यातून काँग्रेस जवळपास हद्दपारच झाली, असे म्हटले जाते.

त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना शहर व तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक भाजप पदाधिकारी बाळगून होते. मात्र त्यांच्या या अपेक्षेवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या अति आत्मविश्वासाने पाणी फेरल्याचे बोलले जात आहे.

लीड खरोखर अपेक्षेप्रमाणे?

तळोद्यात भाजपच्या गोटात प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी शहराध्यक्ष योगेश चौधरी, शहराध्यक्ष गौरव वाणी, विधानसभा प्रभारी कैलास चौधरी, माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष चौधरी, हेमलाल मगरे, किसान आघाडीचे श्याम राजपूत अशी परिचित नाव होती आणि त्यांना स्थानिक आमदार राजेश पाडवी व निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेले माजी मंत्री पद्माकर वळवी यांची साथ होती. (latest marathi news)

त्याचप्रमाणे हजारोच्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्याच्या ताफा आणि विविध संघटनांचा सपोर्ट असे सर्व असूनही शहरातून भाजपला फक्त अडीच हजारांचा लीड मिळाला आहे. गेल्यावेळी हा लीड सहा हजारांचा होता. त्यामुळे हा लीड खरोखरच अपेक्षेप्रमाणे आहे का, असे राजकीय जाणकारांमधून चर्चिले जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या लीडचे विश्लेषण करावे, असेही यानिमित्ताने बोलले जात आहे.

आत्मपरीक्षण करण्याची वेळ

तळोदे शहरात भाजपला अतिशय अनुकूल वातावरण असून लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करण्याची आवश्यकताच नाही, अशा भ्रमात भाजपचे स्थानिक पदाधिकारी होते, असे बोलले जात आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने शहरात भाजपच्या प्रचार व्हायला पाहिजे होता, तो झालाच नाही.

नागरिक आपल्यालाच मतदान करतील, या भ्रमात भाजपचे पदाधिकारी राहिले आणि त्यामुळेच भाजपचा लीड शहरात मर्यादित राहिला, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. तालुक्यातून तब्बल २१ हजारांचा लीड काँग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांना मिळाला. त्यामुळे तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे आणि हा लीड तोडण्यासाठी भाजपला प्रचंड मेहनत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT