army 
उत्तर महाराष्ट्र

सैन्यातील जवानांना मालमत्ता कर शंभर टक्के माफ 

भूषण श्रीखंडे

जळगाव ः शौर्यप्राप्त सैनिक किंवा सैनिकाच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्ताकरात सूट देण्याची योजना शासनाने 2016 ला सुरू केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत सैन्यातील जवान अथवा त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे मालमत्ता असेल तर त्यात शंभर टक्के सवलत देण्याचीही तरतूद असून, जळगाव महापालिका हद्दीत सातशेपेक्षा अधिक जवानांना या सवलतीचा लाभ मिळत आहे. मात्र, असे असले तरी जवान हयात असताना त्याच्या पत्नीच्या नावे मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेवर सवलत नाही. त्यामुळे अशा मालमत्तांवर सवलत मिळण्यासाठी पालिकेने ठराव करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 


देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान तसेच शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे जळगाव शहर महापालिकेने 2017 पासून महासभेत सैनिकांची नावे असलेली तसेच शहीद जवानांच्या पत्नीच्या नावे शहराच्या हद्दीत असलेल्या मालमत्तेवर मालमत्ता कर न लावण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महापालिका प्रशासन गेल्या तीन वर्षांपासून सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना ही मालमत्ता करमाफीची सुविधा देत आहे. शहरात सुमारे सातशे ते आठशे सैनिकांच्या मालमत्तांची संख्या आहे. 

पाणीपट्टीत मात्र सूट नाही 
शासनाच्या अध्यादेशानुसार जवानांच्या मालमत्ता करात फक्त सवलत देण्याची तरतूद आहे. पाणीपट्टीत सूट देण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे जळगाव महापालिका हद्दीत अशाप्रकारची सवलत घेणारे जेवढे जवान अथवा त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांना पाणीपट्टी पूर्ण भरावी लागत आहे. 

आर्वजून पहा : जळगाव तहसीलचे रेकॉर्ड आगीच्या भक्ष्यस्थानी

आठ लाख रुपयांची सवलत 
दरवर्षी जवान व शहीद जवानांच्या कुटुंबांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर करमाफी महापालिका देण्यात येत आहे. सुमारे सातशे ते आठशे मालमत्तांची संख्या असून, यात सुमारे आठ लाख रुपये कर महापालिका दरवर्षी माफ करत आहे. 


पत्नीच्या नावे असेल तर सवलत नाही 
शहरात काही सैनिकांच्या मालमत्ता पत्नीच्या नावे आहेत. परंतु, मालमत्ताकर माफीच्या सुविधेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. मालमत्ता जर जवान स्वत: अथवा ते दोघेही पती-पत्नी अथवा शहीद जवानाच्या विधवा पत्नी अशांच्या नावे असेल तरच मालमत्ता करात सवलत देण्याची तरतूद आहे. पती हयात असताना मालमत्ता पत्नीच्या नावे असेल तर मालमत्ता करात सवलत नाही, त्यामुळे काही जवान या योजनेपासून वंचित राहत आहेत. 

महासभेचा हवा ठराव 
पती हयात असताना पत्नीच्या नावे मालमत्ता असेल आणि अशा प्रकरणात सवलत हवी असेल तर महासभेला तसा ठराव करावा लागणार आहे. महापौरांच्या आदेशाने असा ठराव महासभेत आणता येतो, तो पारित होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास अशा मालमत्तांवरही सवलत देता येणार आहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या महासभेत हा ठराव होईल, अशी शक्‍यता आहे. 

सैनिकांप्रती आदर असून त्यांच्या देशाप्रती समर्पणाबाबत आम्हाला अभिमान आहे. जवान हयात असतानाही त्याच्या पत्नीच्या नावे मालमत्ता असेल तर त्या मालमत्ता करात सवलत देण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यासंबंधी ठराव महासभेत आणू. 
- भारती सोनवणे (महापौर) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT