रेकॉर्डरुमची बंद खोली जळून खाक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव :- शहरात मध्यवर्ती बळीराम पेठेतील तहसील कार्यालयास रात्री आग लागल्याची घटना घडली. कार्यालयातील मागील बाजुस निवडणूक आणि पुरवठा विभागाच्या रेकॉर्डरुमला लागलेल्या आगीत महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, शॉटसर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तहसीदार वैशाली हिंगे यांनी व्यक्त केला आहे.
बळीरामपेठ भागातील हेरिटेज दर्जा प्राप्त तहसील कार्यालयाच्या इमारतीत मागील बाजुस निवडणुक आणि पुरवठा शाखेत रात्री 11 वाजेपुर्वी भिषण आग लागली. आगीचे लोट आकाशात उठू लागल्यावर जिल्हापरीषद कार्यालयातील वॉचमनद्वारे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कळवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसींग रावळ यांनी कळवल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे, प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पुर्वी शहर पोलिस ठाण्याचे अमलदार विजय निकुंभ, रतन गिते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले होते. दोन अग्नि बंबाच्या साहाय्याने पाऊण तासात आगिवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले.
विद्युत तारांचे जाळे
तहसील कार्यालयाच्या दगडी बांधकामातील इमारतीत सर्वदुर डोक्यावर विद्युत तारांचे जाळे पसरलेले असून आग लागली त्या खोल्यांच्या बाहेरही तशीच परिस्थीती असून या तारांमध्ये शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तहसील कार्यालातील तारांच्या भेंडोळ्यासाठी वारंवार एमएसईबीला कळवण्यात आल्याचेही येथील कर्मचाऱ्यांनी माहिती देतांना सांगीतले.
- शाटसर्किटची शक्यता
तहसील कार्यालयातील विद्युतपुरवठा करणाऱ्या तारांमध्ये शॉटसर्किट होवुन आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असुन निवडणुक आणि पुरवठा विभागाशी संबधीत कागदपत्रे या खोल्यांमध्ये होते. नेमके काय नुकसान झाले आहे हे आताच सांगता येणे शक्य नसून सकाळी पहाणी केल्यावर झालेल्या नुकसानी बाबत स्पष्टता होईल.
- वैशाली हिंगे
तहसीलदार जळगाव,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.