parsul nadi saundane.jpg 
उत्तर महाराष्ट्र

हिरमुसलेल्या नदी नाल्यांना आनंदाचा पाझर !

सुमित बच्छाव : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : दुष्काळ आणि मालेगाव हे समीकरणच जणू गेली अनेक वर्षे बनू लागले होते. तालुका गेली अनेक वर्षे दुष्काळाचा दाह सोसत होता. साधारण दोन ते तीन दशकांपूर्वी खळखळून वाहणारे नद्या नाले गेल्या काही वर्षांपासून हिरमुसलेल्या अवस्थेत होते. जून मध्ये सुरु झालेला मान्सून काही काळ शांत झाल्यानंतर परतीच्या पावसाने तालुक्याच्या बऱ्याचशा भागाला अक्षरशः चिंब भिजवले आहे. यामुळे गेली अनेक वर्षे हिरमुसलेल्या नद्या नाल्यांना मात्र आनंदाचा पाझर फुटला आहे.

 परतीच्या पावसाने नदीनाले भरले

 किमान दशकभर तरी मालेगाव तालुक्याने दुष्काळ याची देही अनुभवला. शेतकरी, व्यावसायिक, मजूर आणि समाजाचे इतर अनेक घटक दुष्काळासामुळे हैराण झाले होते. पावसाअभावी बऱ्याचशा नद्या नाल्यांना पाणी येणेच बंद झाले होते. काही काही नद्या नाल्यांचा तर आसपासच्या रहिवाशांनी रस्ता म्हणून वापर सुरू केला होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी खळखळणारे नद्या नाले नामशेष होण्याच्या मार्गावर होते. परतीच्या पावसाने तालुक्याच्या बऱ्याचशा भागाला अक्षरशः चिंब भिजवले आहे. याचा बाजरी, कांदा, कापूस, कांद्याचे रोप आदी पिकांवर विपरीत परिणाम होणार असला तरी यामुळे गेली अनेक वर्षे हिरमुसलेल्या नद्या नाल्यांना मात्र आनंदाचा पाझर फुटला आहे. तालुक्यातील अनेक नद्या नाले खळखळून वाहतांना दिसत आहेत. 

तालुक्यातील माळमाथा, काटवन, दाभाडी-रावळगाव पंचक्रोशी, सोनज-सौंदाणे पंचक्रोशी, निमगाव परिसर सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक नद्या नाल्यांना पाणी आले  असून त्याच सोबत गावकऱ्यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला आहे. बालपणी नद्या नाल्यांच्या पाण्यात केलेली मौज मस्ती डोळ्यासमोर आली आणि विविध गावागावात पारांवर सध्या हाच विषय चर्चिला जाऊ लागला आहे.

अनेक वर्षानंतर खळखळणारे नदी नाले

-सौंदाणे येथील परसुल नदी
-सोनज येथील बोर नाला
-माळमाथा भागातील म्हसार्डी नाला
-कळवाडी येथील शाकी नदी
-देवघट येथील आंबा नाला
-दाभाडी परिसरातील लेंडी नाला, लोंढा नाला
-गिरणेला मिळणारी दोध्याड नदी
-काटवन परिसरातील बोरी नदी  इ

प्रतिक्रिया
गेली अनेक वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर ह्यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे लुप्त झालेला नद्या, नाल्यांच्या नैसर्गिक खळखळाट पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. 
- गोकुळ बच्छाव, सोनज

शहरासोबतच ग्रामीण भागातील लहान बालकांना नदी नाले म्हणजे काय हे सांगण्याची परिस्थिती येऊन ठेपली होती. परंतु सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसाने मात्र नद्या नाल्यांचे सुंदर स्वरूप सर्वांना अनुभवायला मिळाले आहे. 
- दिपाली बोरसे-कापडणीस, कजवाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT