esakal
उत्तर महाराष्ट्र

Kanbai Utsav 2023 : ‘वई वई येजो व मनी कानबाई माय’चा गजर; हजारो भाविकांच्या उपस्थितीत कानुबाईमातेला निरोप

सकाळ वृत्तसेवा

Kanbai Utsav 2023 : ‘वई वई येजो व मनी कानबाई माय... लव्ह लव्ह चाल माता माथे ऊना याय व...’ यासह विविध अहिराणी-मराठी गीतांच्या मधुर आवाजात बॅंड व डीजेच्या तालावर नाचत, ठिकठिकाणी महिला-युवतींनी फुगडी खेळत जल्लोषात सोमवारी (ता. २१) खानदेशचे कुलदैवत कानुबाईमातेला निरोप देण्यात आला.

हिंदू धर्मातील गणेशोत्सव, नवरात्र व कानुबाई उत्सव नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत जल्लोषात साजरे केले जातात. हे तिन्हीही उत्सव सामाजिक, कौटुंबिक एकता टिकवून ठेवणारे आहेत.

सणानिमित्त नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असलेली कुटुंबेही गावाकडे परततात. त्यामुळे उत्साही वातावरण तयार होते. (kanbai mata utsav celebrated in khandesh nandurbar news)

कानुबाई उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावाकडे आली आहेत. त्यामुळे गजबज वाढली होती. रविवारी कानुबाईची स्थापना, रोटपूजन व आज विसर्जन असे स्वरूप उत्सवाचे होते. रात्रभर भजन, कीर्तन विविध धार्मिक कार्यक्रमांच्या रेलचेलसह कानुबाईचे गुणगान गाणारी गीते म्हणत नाचण्याचा आनंद आबालवृद्धांनी लुटला. सोमवारी सकाळी देवीची आरती व पूजा केल्यानंतर डोक्यावर बाजवट ठेवून देवीला गाव व परिसरातील नदीकडे नेत निरोप देण्यात आला.

नंदुरबार शहरातील पश्‍चिमेस असलेल्या नदीवर कानुबाईमातेचे विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी नवीन लग्न झालेले जोडपे, ज्यांनी नवस केले आहेत ते जोडपे किंवा एखाद्याकडे आनंदाने देवीची स्थापना केली आहे त्या कुटुंबातील महिला-पुरुष देवीला वाजतगाजत घरापासून माळीवाड्यातील धानोरा नाक्याकडे एकत्र आले. एकाच ठिकाणी शेकडो कानुबाया एका रांगेत आल्या. तेथे शेकडो हजारो महिला-पुरुष जमले.

एकामागून एक मिरवणूक पुढे नदीकडे गेली. सकाळी आठपासून निघालेली मिरवणूक दुपारी बारापर्यंत नदीवर पोचली. तेथे देवीला अंघोळ घालून विसर्जन केले. पूजासाहित्य नदीच्या पात्रात सोडले. सर्वांनी अंघोळी केल्या. तसेच एकमेकांवर पाणी उधळत आनंद लुटला. अशा जल्लोषाच्या वातावरणात कानुबाईमातेला निरोप देत पुढील वर्षासाठी लवकर येण्याचे निमंत्रणच जणू भाविकांनी गीतांच्या माध्यमातून दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाविकांसाठी पाणी उपलब्ध

येथील (कै.) मोहनबापू चॅरिटेबल ट्रस्टमार्फत कानुबाईमाता उत्सव विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथील दसेरा मैदानावर करण्यात आली होती. यात सुमारे ५१ पाण्याचे जार पाणीवाटप करण्यात आले.

भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी या पाणपोईची मदत झाली. (कै.) मोहनबापू चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चार वर्षांपासून भाविकांना मोफत पाणीवाटप करण्यात येत आहे. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी, भरत चौधरी, सुरेश घरटे, पुंडलिक चौधरी, राज इंद्रजित, राजेंद्र चौधरी, भालचंद्र चौधरी, मुकेश घाटे, स्वप्नील घरटे, महेश चौधरी, मोहित घाटे, धीरज घाटे, नीलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

मंत्र्यांनी धरला ठेका

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही कानुबाई विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत डोक्यावर कानुबाई धरून ठेका धरला. त्यांच्यासोबत त्यांची कन्या तथा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित याही उपस्थित होत्या. त्यांच्या या मिरवणुकीतील सहभागाने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT