Sitaram Bhagat and devotees pulling baragadi langad on the occasion of Khanderao Maharaj Yatrotsava.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Khanderao Maharaj Yatrotsav : येळकोट येळकोट जय मल्हार..! खंडेराव महाराज यात्रोत्सव जल्लोषात

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Khanderao Maharaj Yatrotsav : ‘येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय!’च्या घोषात येथील खंडेराव महाराज यात्रोत्सव जल्लोषात व चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. (Khanderao Maharaj Yatrotsav celebration in nandurbar news)

पंचक्रोशीतल हजारो भाविकांच्या साक्षीने गुरुवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहाला बारागाडी लांगड सुमारे दीडशे फुटांपर्यंत ओढण्याचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. दक्षिण काशी प्रकाशा येथे गुरुवारी (चैत्र पौर्णिमा) येथील भाविकांचे श्रद्धास्थान खंडेराव महाराज मंदिरात एकदिवसीय यात्रोत्सव जल्लोषात, भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात साजरा झाला.

दुपारपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी येथे गर्दी केली होती. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे लांगड ओढणे कार्यक्रम. जवळपास आठ दिवसांपूर्वीच विविध पूजाविधी कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यात खंडेराव महाराजांचे भगत सीताराम परदेशीभोई यांनी आठवड्याचा उपवास केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गोंधळ, तळी भरणे, जागर, धार फिरवणे, देशी देवतांना आमंत्रण देणे, पूजाअर्चा आदी कार्यक्रम करण्यात आले.

सायंकाळी साडेपाचला माता महादेव, आनंदी माता मंदिराच्या दर्शनासाठी मिरवणूक निघाली. ती खंडेराव महाराज मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर लांगडला प्रदक्षिणा घालण्यात आली. सीताराम परदेशीभोई (भगत) यांच्या कंबरेला बारा गाडी लांगड बांधण्यात आली‘. येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय!च्या जयघोषात सीताराम भगत यांनी सुमारे दीडशे फुटांपर्यंत लांगड ओढून नेली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

लांगडवर शेकडो भाविक विराजमान झाले होते. लांगड बांधणेसह विधिवत पूजेअर्चेसाठी पूना पाटील, विठ्ठल पाटील, अनिल बरडे, राजू गोसावी, विनोद परदेशीभोई, आंबालाल पाटील, माजी सरपंच भावडू ठाकरे, विनोद कोळी, राकेश कोळी, अविनाश गोंधळी, गणपत भिल आदींसह जय मल्हार भक्त मंडळाने संयोजन केले.

त्यानंतर खंडेराव महाराज व सीताराम भगत यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पोलिस निरीक्षक राजन मोरे, तलाठी धर्मराज चौधरी, नंदकिशोर पाटील, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष किशोरअण्णा चौधरी, माजी सरपंच सुदाम ठाकरे, प्रकाश ठाकरे, अरुण भिल, पंडित धनराळे, छोटू सामुद्रे, महेंद्र साठे, रवींद्र भिल, बापू बेडसे, मुकेश पाटील आदींसह ग्रामपंचायत, पोलिस, महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारच्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. यात्रोत्सवानिमित्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT