Nandurbar Kharif Season esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Kharif Season : बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Kharif Season : खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत, मात्र बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (kharif season Agriculture department appeals to farmers to be careful while buying seeds nandurbar news)

अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.

खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्वक वाणाची निवड कशी करावी याबाबत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी नंदुरबार यांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

अशी घ्या काळजी

कपाशीचा दाणा निवडताना वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे

उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा

वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे

रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील/प्रतिकारक्षम वाण असावा.

बागायती, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य वाण निवडावे.

"शेतकऱ्यांनी कपाशीचा योग्य वाण निवडून खरेदी करून ठेवावे, सध्या तापमान जास्त आहे. त्यामुळे ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करावी." -स्वप्नील शेळके, तालुका कृषी अधिकारी, नंदुरबार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT